Subscribe Us

header ads

Raghunath Dhondo Karve: Mathematician, Social reformer of Maharashtra, India

Raghunath Dhondo Karve: Mathematician, Social reformer of Maharashtra, India

रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे: समाजसुधारक, संततिनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक

14 ऑक्टोंबर- स्मृतिदिन 

जन्मदीन : 14 जानेवारी


बालपण आणि शिक्षण:

रघुनाथ कर्वे यांचा जन्म 14 जानेवारी 1882 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सुवर्णदुर्ग जवळच्या मुरुड या गावी झाला . 

रघुनाथ धोंडो कर्वे हे धोंडो केशव कर्वे समाजसुधारक यांचे पुत्र आहेत. धोंडो केशव कर्वे यांची पहिली पत्नी राधाबाई तिच्या पोटी झाला. त्यांची आई राधाबाई ही त्यांच्या लहानपणीच वारली. त्यांचे रघुनाथरावांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मुरुड, मुंबई व पुणे या गावी झाले. 

मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई राज्यात सर्वप्रथम आले. पदवी शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण केले.

सन 1903 मध्ये ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते गणित विषयात सर्वप्रथम आले. पुढे 1911 मध्ये गणित हा विषय घेऊन ते एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. बी. ए. ची पदवी संपादन केल्यावर रघुनाथरावांनी काही काळ शिक्षकाची नोकरी केली. त्यांनी पुण्यातच अण्णासाहेब कर्वे यांच्या आश्रमातच शिकत असलेल्या गंगुबाई गोंडे हिच्याशी त्यांचा विवाह झाला.

 लग्नाच्या वेळी रघुनाथ रावांचे वय 29 वर्ष होते तर गंगुबाईंचे वय 21 वर्षे होते हा त्याकाळी एक अर्थाने प्रौढ विवाह झाला होता. समाजापुढे हा विवाह एक आदर्श विवाह त्या काळात होता. 

गंगुबाई गोडे यांचे नामकरण नाव बदलून रघुनाथ रावांनी मालतीबाई कर्वे हे ठेवलं. त्यांचे शिक्षण त्याकाळी इंटरपर्यंत झाले होते.

रघुनाथ रावांनी काही कंपनीमध्ये नोकरी केली व त्यानंतर पुढे मुंबईचे एल्फिन्स्टन कॉलेज, धारवाडचे कर्नाटक कॉलेज, पुण्याचे डेक्कन कॉलेज, अहमदाबादचे गुजरात कॉलेज, मुंबईचे विल्सन कॉलेज अशा निरनिराळ्या कॉलेजांत त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले.

 रघुनाथ कर्वे फ्रान्सच्या पॅरिस विश्वविद्यालयात गणिताचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी संतती नियमांच्या संदर्भातली अनेक पुस्तकांचे वाचन केलेले होतं. त्या काळामध्येच त्यांचा स्पष्ट वक्तेपणा व मुख्य म्हणजे संतती नियमनाचे समाजात कार्य केल्यामुळे त्यांच्या कार्यामुळे त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले.

xx xx

संततीनियमनवर समाजात कामगीरी आद्य प्रवर्तक :

रघुनाथ धोंडो कर्वे यांनी समाजात महिलांच्या समस्या व महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्त्रीमुक्ती साठी खूप मोठे कार्य केले. या कार्यामध्ये त्यांनी भारतात संतती नियमनाचा सल्ला देण्याचे केंद्र व संततीनियमनाच्या साधनांची विक्री प्रथम त्यांनी व त्यांच्या पत्नी मालतीबाई कर्वे यांनी 1921 मध्ये समाज सुधारण्याचे हे कार्य केले.

 संततीनियमन हा शब्दहीत त्यांनीच प्रथम शोधून काढला व तो समाजामध्ये रूढ केला. हा विषय घेऊन त्यांनी महिलांना मार्गदर्शन, प्रबोधन करून संततीनियमनावर समाजामध्ये काम केले.

मुंबईमध्ये दोघा पती-पत्नींनी परळ भागात संतती नियमनाची साधने विकण्यास सुरुवात केली ती कशी वापरायची याचा सल्लाही ते दोघे संबंधित महिलांना पुरुषांना देत असत. 

मालतीबाई बायकांना तपासून योग्य आकाराची पेसरी बसवून देत असत. ही कामे मालतीबाईंनी अनेक वर्ष रघुनाथरावांच्या सहकार्याने समाजामध्ये केली.

रघुनाथरावांनी" समाजस्वास्थ्य" हे मासिक जुलै 1927 मध्ये सुरू केले या मासिकाच्या कामांमध्ये रघुनाथरावांना मालतीबाईंनी सर्वतोपरी सहकार्य करत होत्या या मासिकामध्ये स्त्रीचे नग्न चित्र व त्यातील लेख हे त्याकाळी समाजामध्ये वादग्रस्त ठरत होते. 

त्या काळात संततीनियमनाची साधने जर्मनीहून मागवत असत. त्याची समाजस्वास्थ्य मधून जाहिरात करत असत विक्री करत असत या सर्वच गोष्टींचा समाजाला अचंबा वाटत असे. हे दोघे पती-पत्नी समाजात चर्चेचा विषय बनले होते.

X X

समाजस्वास्थ्य" मासिकातून समाज सुधारणा:

 समाजामध्ये त्या दोघा पती-पत्नींच्या बद्दल उलट सुलट चर्चा करत असत. पण रघुनाथरावांनी हे समाजासाठी उचललेले पाऊल समाजाच्या हिताचे आहे. 

यातून समाजातली अनेक समस्या निर्मूलन होणार आहे यासाठी त्यांनी अखंडपणे 27 वर्षे समाजस्वास्थ्य मासिकातून समाजसुधारणेचे काम केले.

रघुनाथ धोंडो कर्वे हे संतती नियमनाबद्दल जे काम करत होते. त्याबद्दल जाहीरपणे 25 वर्षानंतर भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रथम मांडला.

 पंचवीस वर्षांपूर्वीच संतती नियमनाच्या संदर्भात रघुनाथ कर्वे यांनी या विषयावर बोलून प्रबोधन करून आणि प्रत्यक्ष पती-पत्नी या दोघांनी कृती करून समाजाला दाखवून दिले होते हे विशेष होते.

समाज स्वास्थ्य मासिकाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यावेळेसचे मंत्री स का पाटील यांनी 5600 रुपयाची थैली दिली होती रघुनाथ रामाने स्वतःचे आत्मचरित्र लिहिलेले नाही. 

वेश्या ही संस्था नाहीशी होऊ नये ती समाजाची गरज आहे. अशी क्रांतिकारक मते त्यांनी मांडली होती. लैंगिक संबधांबाबत रघुनाथ कर्वे उदारमतवादी मतांचे पुरस्कर्ते होते. 

संतती नियमनाचे कार्य व्यक्ती पासून राष्ट्रापर्यंत सर्वांचे कल्याण करणारे आहे.

xx xx

र. धों. कर्वे यांचे परखड विचार :

र. धों. कर्वेची देवावर श्रद्धा नव्हती. ते नास्तिक होते. धर्मातील जाचक व कळस आहेत असे त्यांचे मत होते. स्वतःला हिंदू व ब्राह्मण म्हणवून घेणे र. धो.ना अर्थशून्य चालीरीती त्यांना मान्य नव्हत्या. 

हिंदू धर्मातील अनेक चालीरीती अडाणीपणाचा आवडत नसे. धर्म, अध्यात्म, स्वर्ग, पाप-पुण्य इ. संदर्भात वेडगळ कल्पना लोकांची चांगलीच हजेरी र. धों. कर्वे 'समाजस्वास्थ्य' मधून घेतली नव्हती. 

मित्र-मैत्रिणींचा गोतावळा नव्हता; पण ते सडेतोड, तर्कशुद्ध मांडणी करणारे र. धों. कर्वे यांच्या वागण्यात तुसडेपणा, तिरसटपणा होता. वागण्यात मृदुता नवमतवादी होते. 

समागम स्वातंत्र्य, कामशास्त्र इ. विषयांवर त्यांनी सतत लेखन केले. कौमार्याविषयक वेडगळ समजुती त्यांना मान्य नव्हत्या.

 कौमार्य, योनिशुचिता किंवा नैतिकतेचे नियम हे फक्त स्त्रीलाच लावले जातात हे चुकीचे आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.

 नवऱ्याला देव मानणारी स्त्री अत्यंत ढोंगी असते. स्त्रिया शिकतील. नोकरी करतील तर नवऱ्याला देव मानण्याचे त्यांचे ढोंग संपुष्टात येईल. 

स्वातंत्र्याचे पाणी अंगात मुरल्याशिवाय स्त्रियांची स्थिती कधीही सुधारणे शक्य नाही असेही त्यांचे मत होते.

र. धों. कर्वे अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने आपले विचार मांडत व आपल्या विचारास विरोध करणारांना निरुत्तर करत.

 पुरुषप्रधान संस्कृतीत दडपून गेलेल्या स्त्रियांची बाजू त्यांनी घेतली. स्त्रियांच्या राखीव जागांना त्यांचा विरोध होता. 

स्त्री जेव्हा स्वत: होऊन या राखीव जागा नाकारेल तेव्हा ती पुरुषांच्या बरोबरीने उभी राहील असे त्यांना वाटे. 

स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा हे तत्त्व त्यांना मान्य नव्हते. मुला-मुलींनी एकत्र शाळा शिकल्यास आडकाठी का असावी? असा प्रश्न ते विचारतात. ज्या धोंडो केशव कर्वे यांनी मुलीसाठी स्वतंत्र विद्यापीठ काढले त्यांचेच पुत्र वरील प्रकारे मत मांडतात हा केवढा विरोधाभास. पण त्यालाच आपण बुद्धिप्रामाण्यवादही म्हणू शकतो.

स्त्री घरातील सर्व कामे करते म्हणजे पैसा वाचवते. म्हणजे पर्यायाने पैसा कमावते असा युक्तिवाद ते करतात. 

कुटुंबाचा एकंदर खर्च वजा जाता जी शिल्लक राहील त्यापैकी निम्म्यावर बायकोचा हक्क असायला हवा असे आग्रहाने ते सांगत. 

आपल्या हक्कांसाठीचा लढा खुद्द स्त्रियांनीच पुढे येऊन लढला पाहिजे.

र. धों. कर्वेवर अनेक खटले झाले, गाजले. सारा समाज र. धों. कर्वेच्या विरोधात उभा राहिला. र. धों. कर्वेनी एकाकीपणे त्यास तोंड दिले; पण धोंडो केशव कर्वेनी एकही शब्द आपल्या मुलाच्या बाजूने उच्चारला नाही हे एक आश्चर्यच आहे.

X X

संस्था:

1921 मध्ये संततिनियमनविषयक सांगोपांग माहिती देणारे ‘ राईट एजन्सी ‘ हे केंद्र त्यांनी मुंबईतील भटवाडीमध्ये सुरू केले. 


ग्रंथसंपदा/ निर्मिती:

मराठीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी महत्त्वाची 

1." संततिनियमन " 1923 मध्ये हे मराठी पुस्तक लिहिले.

2. गुप्त रोगांपासून बचाव

3. वेश्याव्यवसाय

4. त्वचेची निगा

5. संतती नियमन: विचार आणि आचार 

6. आधुनिक आहारशास्त्र

7. आधुनिक कामशास्त्र


xx xx

निधन:

समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत तथा र. धों. कर्वे यांचा मृत्यु 14 ऑक्टोंबर 1954 मध्ये झाला.

X X

र. धों. कर्वे बद्दल अन्य विचारवंतांचे मत:

मंगला आठलेकर 'महर्षी ते गौरी' या ग्रंथात मत व्यक्त करतात, 

"र. धों. कर्वे हे नुसते समाजसुधारक नव्हते. ते एक विचारवंत होते. र. धों.नी सुरू केलेले संतती नियमनाचे कार्य व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत सर्वांचे कल्याण करणारे होते. पण त्यांच्या वाट्याला कुचेष्टेशिवाय काही आले नाही. बुद्धिप्रामाण्यावर विसंबणाऱ्या र. धो.च्या विचारांना तुसडेपणाचा रंग नसता तर कदाचित वेगळे चित्र पाहायला मिळाले असते. तरीही र. वाट्याला आलेली उपेक्षा मनाला खिन्न करणारीच आहे यात शंका नाही."

कवी यशवंत, व्ही शांताराम, ना. सी. फडके, मामा वरेरकर, राम गणेश गडकरी, ना. गोखले अशा अनेकांनी पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह केला होता. त्यांचे समर्थन करणारा 'समाजस्वास्थ्य' चा अंक र धों कर्वे यांनी काढला होता हे विशेष होय. 

रॅ. परांजपे यांची कन्या शकुंतला परांजपे यांनी काही कारणांनी पुरुष दुसरे लग्न करत असेल तर आक्षेप असू नये असे मत मांडले होते.

डॉ. य. दि. फडके यांनी 'र. धों. कर्वे' या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात र. धों. कर्वे स्त्रीकडे एक भोगवस्तू म्हणून पाहतात असे मत य. दि. फडकेंनी मांडले आहे. 

आज 21 व्या शतकाच्या प्रारंभीही र. धों. कर्वे यांच्या विचारांचे नावीन्य धक्कादायकत्व संपलेले नाही. 

कुमारी, विधवा व परित्यक्ता यांनाही लैंगिक सुखाची इच्छा असू शकते हे समाजाने मान्य करावे. 

अविवाहितेला लैंगिक सुखाचा हक्कच नाही, विधवा-परित्यक्तांनी तो हक्क गमावलेला आहे या धारणा चुकीच्या आहेत, समागम नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याचा हक्क प्रत्येक स्त्रीला मिळाला पाहिजेच असे ते म्हणत हे त्यांचे विचार त्यावेळेसच्या समाजाला खूपच धक्कादायक वाटले. आजही हे विचार समाज स्वीकारत नाही.

xx xx













View, comments and Share 

Post a Comment

1 Comments