Subscribe Us

header ads

Gopal Hari Deshmukh or Lokhitvadi Raobahadur, Social reformer

गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी: 

रावबहादूर, पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार

जन्मदिन: 18 फेब्रुवारी

स्मृतिदिन - 9 ऑक्टोबर

बालपण आणि शिक्षण:

रावबहादूर, पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुण्यात झाला. 

पेशवाई अस्त होऊन इंग्रजी अंमल भारतात सुरू झाल्यानंतर पाच वर्षांनी लोकहितवादींचा जन्म झाला.

गोपाळरावांचे जुने मूळ आडनाव सिद्धये हे होते. मूळ घराणे त्यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावचे पण त्यांचे पूर्वज विश्वनाथ यांच्याकडे बारा गावांची देशमुख असल्यामुळे त्यांना "देशमुख" हे आडनाव मिळाले. 

1754 मध्ये गोपाळरावांचे आजोबा गोविंदराव हे आपल्या बंधू सह पुण्यात पेशव्यांच्या सेवेमध्ये दाखल झाले.

 गोविंदरावांचे पुत्र गोपाळरावचे वडील हरीपंत हे पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांच्याकडे फडणवीस होते. 

बापू गोखले आष्टीच्या लढाईत मरण पावल्या नंतर हरिपंत हे दुसरे बाजीराव पेशवे यांचे वकील म्हणून पुण्यात राहू लागले. 

त्यांना चार मुले होती. त्यात गोपाळराव हे तिसऱ्या क्रमांकाचे वयाच्या सातव्या वर्षीच गोपाळरावचे लग्न झाले. त्यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई होते. 

गोपाळराव तेरा वर्षाचे असताना त्यांचे वडील हरिपंत वारले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना इंग्रजांनी प्रत्येकी दोनशे रुपये वर्षाला देण्याचे मान्य केले व त्यावर त्यांना आपला उदरनिर्वाह करावा लागला.

गोपाळराव यांचे शिक्षण पुण्यातील बुधवार वाड्याच्या मराठी शाळेमध्ये शिक्षण झाले. 

इंग्रजी भाषेचा अभ्यास त्यांनी खाजगीरीत्या पूर्ण करून काही दिवस कोर्टात नौकरी ही केली. 

वयाच्या आठव्या वर्षी ते पुण्याततील इंग्रजी शाळेत जाऊ लागले. पण 1844 मध्ये त्यांना ही शाळा सोडावी लागली. 

X X

वैयक्तिक जीवन प्रवास:

1844 मध्ये वर्षी त्यांना त्यांच्या झालेल्या शिक्षणावर दक्षिणेकडील सरदारांच्या एजंट कार्यालयात अनुवादकांची नोकरी मिळाली. 

1846 मध्ये ते मुंसफीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि 1852 मध्ये सातारा जिल्ह्यातील वाई येथे "फर्स्ट क्लास मुन्सफ" म्हणून त्यांची नेमणूक झाली.

 एक्टिंग प्रिन्सिपल सदन अमीन" आणि सातारा येथील अदालतीचे " प्रमुख" म्हणून 1853 मध्ये " काही महिने त्यांनी काम पाहिले.  

पुणे येथे उत्तर विभागाचे "सब असिस्टन्स इनाम कमिशनर" म्हणून त्यांची 1855 मध्ये नेमणूक झाली. 

पुढे 1861 मध्ये हिंदू व मुस्लिम कायद्याचा गोषवारा तयार करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. 

अनेक ठिकाणी न्यायालयात मोलाची सेवा बजावून 1879 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. 

X X

लोकहितवादींचे विचार:

भारतातील इंग्रजी सत्ते बद्दल त्यांनी शतपत्रातून नेहमीच आपले विचार प्रगट केले. म्हणजे 'इंग्रजी राज्य ह्या देशावर आले ते ईश्वरी योजनेचा एक भाग म्हणून' असे आपल्या शतपत्रातून अनेकदा स्पष्टपणे लिहिणाऱ्या लोकहितवादींना असा विश्वास वाटत होता की इंग्रजांच्या सहवासामुळे आपला समाज अनेक दृष्टीने संपन्न होईल. 

आधुनिककरणाकडे वाटचाल करेल आणि ह्या देशावर इंग्रजी सत्तेची कायम सत्ता रहावी असे मात्र त्यांना वाटत नव्हते.

 स्वतःचे राज्य चलन्या इतकी परिपक्वता आपल्या लोकात आली पाहिजे तर ते रामराज्यापेक्षाही अधिक चांगले राज्य आपले करून दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. 

आपल्या देशातल्या तरुणांनी शिक्षण घेऊन नोकरीच्याच मागे न लागता आपल्या देशात व्यापार उद्योगधंद्यात तरुणांनी मनःपूर्वक लक्ष दिले पाहिजे असेही ते आपले मत शतपत्रातून नेहमीच मांडत असत. 

शिक्षण हे समाज परिवर्तनाचा मूलभूत आधार घटक आहे. विद्येचे क्षेत्र मर्यादित ठेवले गेले तर विद्या प्रसार होऊ शकत नाही आणि विद्याही वाढविली जात नाही. 

विद्या म्हणजे केवळ धर्माचे ज्ञान असा विद्येचा संकुचित अर्थ काढला नाही पाहिजे असेही त्यांचे मत त्यांनी व्यक्त करत होते.

भारतातील सर्व धार्मिक लोकांना सारखे कायदे असावेत असे लोकहितवादींचे मत होते. 

सुखदुःख देणारे सर्व कायदे सर्व जातीत व सर्व धर्मास एकसारखे असावे. कारण सर्व मनुष्य राज्य रक्षणाचे समान अधिकार आहेत त्याआधी न्यायात भेद नसावा असे ते म्हणत.

देशाच्या आर्थिक विकासावर सुद्धा व प्रश्नावर सुद्धा त्यांनी खोल विचार करून त्यांनी 1849 मध्ये लक्ष्मीज्ञान नावाचा हा मराठी ग्रंथ हा अर्थशास्त्रीय ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे. या ग्रंथात शेवटच्या भागात हिंदुस्तानविषयी विचार अशा प्रकरणाचे शीर्षक आहे. त्यात संपत्तीच्या उत्पादनाचे एकमेव कारण श्रम हेच आहे. समानतावादी अर्थशास्त्राचे मत त्यांनी स्वीकारल्याचे दिसते.

X X

लोकहितवादींचे लेखन:

गोपाळरावांनी "लोकहितवादी" या टोपण नावाने "शतपत्रे" लिहिली. त्यामुळे त्यांचे नाव "लोकहितवादी" पडले.

 त्यांची शतपत्रे भाऊ महाजन यांच्या प्रभाकर पत्रातून 1848 ते 1850 या काळात प्रसिद्ध झाली. ही "शतपत्रे" एकूण 108 होती.

 समारोपाचे शंभरावे पत्र म्हणजे निबंध लिहिल्यानंतर आणखी शंभर लिहावेत हा उद्देश त्यांचा होता पण त्यांनी पहिल्या शंभर पत्रात आठ निबंधाची भर घालून "अष्टोत्तरशतपत्रे" पूर्ण केलेली आहेत. त्यांनी आपल्या निबंधातून आपली राजकीय मते तसेच विद्याप्रसार, आचारधर्म, परमार्थ, अनिष्टचाली, समाजसुधारणा इत्यादी विषयावर आपले विचार व्यक्त केले. म्हणजे या विचारांनी एकविसाव्या शतकातील वैचारिक प्रबोधनाचा पायाच घातला असे म्हणता येईल.

X X

ग्रंथ निर्मिती:

ग्रंथ निर्मिती आणि विद्या वृद्धी ह्या दोन्हीतील नाते अतूट असते म्हणूनच उत्तम शिक्षण आणि दर्जेदार ग्रंथ निर्माण झाले पाहिजे. 

भारतात बहुभाषी प्रदेश आहेत सर्वत्र विद्या प्रसार करावयाचा असेल तर प्रादेशिक भाषातून ग्रंथ तयार झाले पाहिजे या सर्व भाषांत तयार होऊन विद्यावृद्धी वाढली पाहिजे असे ते नेहमी सांगत असत. 43 मराठी ग्रंथ त्यांनी लिहिले. 

1. 1848 ते 1850 या काळात ’प्रभाकर’ या साप्ताहिकातून त्यांनी "शतपत्रांचे" लेखन केले. स्त्रियांचा कोंडमारा करणार्‍या रुढींवर त्यांनी प्रहार केला. 

2. लोकहितवादींनी 1849 मध्ये "लक्ष्मीज्ञान" हा ग्रंथ मराठीतील अर्थशास्त्रीय पहिला ग्रंथ लिहिला.

3. 1876 मध्ये एकूण आठ लेख त्यांनी "हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे" या शीर्षकाखाली "इंदूप्रकाश" मध्ये लिहिले.

4. 1849 मध्ये "कामगार लोकांशी संभाषण"

5. 1850 मध्ये "यंत्रज्ञान"

6. 1851 मध्ये "खोटी शपथ वाहू नये आणि खोटी साक्ष देऊ नये याविषयी लोकांशी संभाषण"

7. 1874 मध्ये गुजराती भाषेतील "निगमप्रकाश"

8. 1877 मध्ये "जातीभेद"

9. 1878 "गीतातत्व"

10. 1880 मध्ये "सार्थ अश्वालायन गृह्यसुत्र"

11. 1883 मध्ये "ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती"

12. 1883 मध्ये "स्थानिक स्वराज्य संस्था" 

13. 1883 मध्ये "पंडित स्वामी श्रीमददयानंद सरस्वती" 

14. 1884 आणि 1885 मध्ये "ऐतिहासिक गोष्टी " भाग 2

15. 1885 मध्ये "गुजरातचा इतिहास"

X X

लोकहितवादींनी स्थापन केलेल्या संस्था:

गोपाळरावांचे सामाजिक कार्यही लोकहितवादी पण सार्थ ठरणारे आहे. नोकरीच्या निमित्ताने ते जेथे गेले तेथे त्यांनी समाज उपयोगी संस्था निर्माण केल्या.

1. वाई येथे असताना त्यांनी एक वाचनालयाची स्थापना केली. 

2. पुण्याच्या "नेटिव्ह जनरल लायब्ररी"च्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. 

3. पुण्यात तेलुगु वाचकांसाठीही त्यांनी एक ग्रंथालय सुरू केले होते.

4. "ज्ञानप्रकाश" या महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता.

5. मुंबईहून निघणाऱ्या "इंदुप्रकाश" या पत्राच्या स्थापनेतही  महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची होती. 

6. स्वतःच्या नावे "लोकहितवादी " असे नियतकालिक ही ते चालवीत होते. 

7. अहमदाबाद येथे असताना गुजराती "प्रार्थना समाज, गुजराती पुनर्विवाह मंडळ " यांची स्थापना करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

8. "हितेच्छु" हे इंग्रजी पत्र काढण्यातही त्यांची प्रेरणा होती.

9. मुंबईत आर्य समाजाचे प्रमुख पदही काही काळ त्यांच्याकडे होते.

10. अहमदाबाद येथे " प्रार्थना समाजाची स्थापना" करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.

X X

निधन:

सेवानिवृत्तीनंतर गोपाळराव 1884 मध्ये रतलाम संस्थांचे दिवाण म्हणून त्यांनी कामकाज केले त्या ठिकाणी त्यांनी वर्षभर हे काम पाहिले पण सेवानिवृत्तीच्या काळात त्यांना पत्नी तीन मुले आणि दोन मुली यांच्या मृत्यूचे दुःख अचानक झाल्यामुळे त्यांचे देहभान हरवले ते थकले आणि पुणे येथे त्यांचे 9 ऑक्टोबर 1892 मध्ये निधन झाले.







X X

View, comments and Share 

Post a Comment

1 Comments