Subscribe Us

header ads

Indo-Greek (Bactrarian) - Minander. इंडो-ग्रीक (बॅक्ट्रेरियन) - मिनँडर

Indo-Greek (Bactrarian) - Minander

इंडो-ग्रीक (बॅक्ट्रेरियन) - मिनँडर 



अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर सेल्युकस निकेटर हा बाबिलोनियाचा राजा झाला.

 त्याने बॅक्ट्रियन प्रदेश जिंकून साम्राज्यविस्ताराला प्रारंभ केला. त्याने स्वतःच्या सेल्युसिड वंशाची स्थापना केली.

 इ.स.पू. 304 मध्ये त्याने चंद्रगुप्त मौर्यावर आक्रमण केले व त्याचा पराभव झाला. 

सेल्युकस निकेटर व चंद्रगुप्त यांच्यात जो तह झाला त्यानुसार कंदाहार, काबूल, बलुचिस्तान, हेरात हे पूर्वेकडील प्रदेश त्याने चंद्रगुप्ताला द्यावेत असे ठरले. 

पुढे अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य सत्तेला उतरती कळा लागली. त्याचा फायदा ग्रीकांनी पुन्हा घेतला. 

ग्रीकांचा एक राजा अँटीओकस तिसरा (इ.स.पू. 223-187) याने भारतावर आक्रमण केले. पण त्याच्या राज्यात बंडाळी माजल्याने तो परत गेला. 

X X

डिमिट्रियस (इ.स.पू. 190 ते इ.स.पू. 175) या दुसऱ्या एका ग्रीक राजाने इ.स. 183 मध्ये भारतावर स्वारी केली. यावेळी भारतात मौर्य सत्तेचा अस्त झाला होता व शुंग राजवटीचा उदय झाला होता. 

डिमिट्रियसने पंजाब, मध्य प्रदेश गुजरात, काठेवाडपर्यंतचा भूप्रदेश जिंकून घेतला. त्याने अलेक्झांडरपेक्षा अधिक प्रदेश जिंकल्याचे स्टॅबी हा इतिहासकार मत मांडतो.

 मथुरा, अयोध्येवर हल्ले केले. तक्षशिला जिंकल्यानंतर त्याने आपल्या सैन्याचे दोन भाग केले. 

एका विभागाचे नेतृत्व मिनडरकडे दिले व त्यास साकेत, पाटलीपुत्र, मथुरा वगैरे प्रदेश जिंकण्यासाठी पाठवले. 

X X

दुसऱ्या विभागाचे नेतृत्व अपोलोडोटसकडे दिले. 

डिमिट्रियस अशा प्रकारे भारताच्या स्वारीत गुंतला असता बॅक्ट्रिया या देशातच बंडाळी झाल्याने त्याला परत जावे लागले. 

सेल्युकशच्या वंशातील युक्रेटायडिजने डेमिस्टियस भारतातून परतण्याच्या आतच बॅक्ट्रियाचे पितृदत्त राज्य बळकावले एवढेच नव्हे तर त्याने जिंकलेल्या भारताच्या भागावरही आक्रमण केले.

 त्यामुळे ग्रीकांच्या ताब्यातील भारताचे दोन भाग झाले.

 एकाची राजधानी सियालकोट तर दुसऱ्याची तक्षशिला होती. 

या दोन्हीही शाखांच्या राज्यांनी ४० वर्षे राज्य केले. ते त्यांनी पाडलेल्या नाण्यांवरून दिसते.

X X

मिनँडर 

डिमिट्रियस या ग्रीक राजाचा मिनँडर हा सेनापती होता.

 डिमिट्रियसच्या आज्ञेवरून भारतात ग्रीकांची संख्या प्रस्थापित करण्याचे कार्य त्याने केले. 

तो भारतीय इतिहासात प्रसिद्ध पावला याचे कारण त्याने केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार तसेच 'मिलिंदपन्हा' या बौद्ध ग्रंथामुळेही त्यांचे नाव गाजले. 

आचार्य नागसेन हा प्रसिद्ध बौद्ध भिक्षू होता. 

मिनँडर व नागसेन यांच्यात बौद्ध धर्मासंबंधी जी प्रश्नोत्तरे झाली ती म्हणजे 'मिलिंदपन्हा' हा ग्रंथ होय. 

मिनँडर याने विचारलेले सर्व प्रश्न प्रामुख्याने बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान व शिकवण यासंबंधी आहेत.

स्ट्रैबो या प्राचीन ग्रीक इतिहासकाराने मिनँडरविषयी खूप विस्ताराने लिहिले आहे. मिनँडरच्या कालखंडाबाबत इतिहासकारांत मतभेद आहेत. 

इ.स. पूर्व 115-90 या काळात तो सत्तेवर होता असे डॉ. डी. सी. सरकार यांचे मत आहे तर प्लुटार्क या ग्रीक इतिहासकाच्या मते व गार्गी संहिता यांच्या आधारे तो इ.स.पू 165 च्या दरम्यान सत्तेवर होता असे मत रॅपसनने व्यक्त केले आहे. 

मिनँडरने प्रदीर्घ काळ राज्य केल्याचे त्याच्या नाण्यावरून दिसते. तरुण काळापासून ते वृद्धापकाळापर्यंतची त्याची नाणी उपलब्ध आहेत.

मिनँडरने हिंदुकुशपासून बुंदेलखंडपर्यंत व काश्मीरपासून भडोचपर्यंतचा प्रदेश जिंकला होता. 

साकेत (पाकिस्तानातील सियालकोट हे शहर) त्याच्या राजधानीचे शहर होते. या शहराचे अत्यंत सुंदर वर्णन 'मिलिंदपन्हा' (मिनँडरचे प्रश्न) या ग्रंथात केला आहे.

 मिनँडर हा परकीय राजा असूनही त्याने बौद्ध धर्माला आश्रय दिला. साकेत हे बौद्ध भिक्षूंचे फार मोठे केंद्र होते. 

शुंग राजा पुष्यमित्र हा वैदिक धर्माचा पुरस्कर्ता व मिनँडरचा समकालीन होता. अगदी त्याच काळात मिनँडरने बौद्ध धर्माचा स्वीकार करून बौद्ध धर्माला आश्रय द्यावा हे विशेष होय. 

मिनँडरच्याच काळात ग्रीक व भारत यांच्यात सांस्कृतिक आंतरक्रिया घडून आली. म्हणजेच ग्रीकांचा भारतीय संस्कृतीवर व भारतीयांचा ग्रीकांवर प्रभाव पडला. 

ग्रीक हे परकीय व आक्रमक असले तरी मौक राजांनी भारतीय धर्म, तत्त्वज्ञान, रूढी, परंपरा यांचा स्वीकार केला होता है दिसते मिलँडर हा न्यायी, दयाळू व प्रजाहितदक्ष सम्राट होता. 

त्याचे सर्व आयुष्यः भारतीय प्रदेशात गेले. काश्मीरपासून गुजरात, काठेवाडपर्यंतच्या प्रदेशात त्याची नाणं सापडली आहेत. 

अलेक्झांडरपेक्षाही भारतातील त्याचे राज्य मोठे होते. तत्कालीन पाल ग्रंथात मिनँडरची स्तुती आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अवशेषांवर स्तूप बांधण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली होती. 

तेव्हा त्याच्या अस्थीचे वाटप करून अनेक स्तूप उभारले गेले. मिनॅडरने मध्य आशियात बौद्ध धर्म लोकप्रिय केला ही त्याची विशेष कामगिरी होय. 

X X

मिलँडरचा समकालीन  अँन्टीअलकिडस (महाराज अंतालिकित) हा तक्षशिलेचा ग्रीक राजा हाता. त्याने आपला वकील हेलिओडोर याला विदिशाचा शुंग राजा कोत्सीपुत्र याच्या दरबारात पाठवले होते. 

त्याने भागवतधर्म स्वीकारला व त्या स्मृतिप्रीत्यर्थ नजीकच्या बेसतनगर येथे गरुडध्वज (स्तंभ) उभा करून त्यावर एक प्राकृत लेख कोरविला. (इ.स. पू. 133).

मिनडरनंतर ग्रीकांचा अंमल 100 वर्षे टिकला असला तरी ग्रीक राज्ये विस्कळीत होती. 

अलेक्झांडरचे आक्रमण व बॅक्ट्रियन ग्रीकांची आक्रमणे यात खूपच फरक आहे. 

अलेक्झांडरने जिंकलेले प्रदेश केवळ 6 वर्षांनंतर चंद्रगुप्त मौर्याने जिंकल्याने अलेक्झांडरचा कोणताही प्रभाव भारतीय प्रदेशावर पडला नाही. 

याउलट बॅक्ट्रियन सत्ताधीशांच्या ताब्यात मात्र फार मोठा भूप्रदेश 150 पेक्षा अधिक वर्षे होता. त्याच्या ताब्यात जो प्रदेश होता तेथे ग्रीक संस्कृती रुजली गेली त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान ग्रीसपर्यंत पोहोचले.








Comment and share

Post a Comment

3 Comments