Saka (Cynthian) Rudradaman : Maus, the first great king of the Saka
शक (सिंथियन) रुद्रदामन : शकांचा पहिला श्रेष्ठ राजा मऊस
दक्षिण भारतात जेव्हा सातवाहनांचे राज्य विशेषतः पहिल्या-दुसऱ्या शतकात वैभवाच्या शिखरावर होते तेव्हा उत्तर भारतात बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, वायव्य सरहद्द प्रांत इ. ठिकाणी अनागोंदी होती.
अनेक लहान राज्ये अस्तित्वात होती व ती आपसांत संघर्ष करीत असत. याचा फायदा परकियांनी घेतला.
शक व कुशाणांनी भारतीय प्रदेशावर हल्ले केले आणि तेथे राज्ये स्थापन केली.
X X
शक हे मूळचे कोण होते?
इ.स.पू. चौथ्या शतकात मध्य आशियात शक नावाची जमात राहत होती.
शक हे रानटी, भटक्या वृत्तीचे, पशुपालनाचा व्यवसाय करणारे होते. लुटालूट करणे, क्रूरपणाने वागणे याबद्दल त्यांची ख्याती होती. परंतु कुशाणांनी त्यांचा पराभव केला व मध्य आशियातून त्यांना हाकलून दिले.
ख्रिस्तपूर्व तिसऱ्या व दुसऱ्या शतकात पश्चिम व मध्य आशियात भटक्या टोळयांम ध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष झालेला दिसतो.
चीनमधील यु-चीह टोळ्या, ग्रीकांच्या टोळ्या, शकांच्या टोळ्या, पल्लवांच्या टोळ्या इत्यादींनी एकमेकांवर हल्ले करून आपले वर्चस्व वाढवण्यास प्रारंभ केला. या घु चौह (कुशाण) टोळ्यांनीच शकांना मध्य आशियातून इराणमध्ये हाकलून दिले.
शकांना बॅक्ट्रियन व परिचित साम्राज्यांशी संघर्ष करावा लागला, मित्रदत्त दुसरा (इ.स.पू. 133 ते इ.स.पू 88) यो पल्लव सम्राटाने शकांचा प्रतिहार केला व प्रशियाकडील शकांचा लोंढा थांबवला.
अनेक शक टोळ्या हेल्मंड खोऱ्यातून, कंदाहारमार्गे बोलन खिंडीतून सिंधकडे उतरल्या.
X X
काही शक टोळ्यांनी पल्लवांची सत्ता मान्य करून आपली छोटी छोटी मांडलिक राज्ये निर्माण केली.
सिंधू नदीच्या खोऱ्यात आक्रमण करून येणाऱ्या शकांच्या टोळ्या या प्रामुख्याने पूर्व इराणमधून आल्या होत्या.
शकांचा भारतातील प्रवास वायव्य सरहद्द प्रांत कंदाहार -सिंधू नदीचे खोरे काश्मीर-पंजाब-सिंध-माळवा-गुजरात-काठेवाड असा होता.
टॉलेमी या प्राचीन ग्रीक भूगोलतज्ज्ञाने व 'पेरिप्लस ऑफ दे युरेथ्रिअन सी' या ग्रंथात शकांसंबंधी माहिती लिहून ठेवली आहे.
मा-त्वा-लीन या चिनी लेखकाने लिहिलेल्या विश्वकोशात शकांचा इतिहास दिला आहे.
भारतातील शकांच्या राजाचा विचार करता खालील चार राजांचा उल्लेख करावा लागतो.
1) मऊस किंवा मोगा (इ.स.पू. 20 ते इ.स.22)
2) अझस पहिला (इ.स.पू. 5 ते 30)
3) अझिलिसस् (इ.स. 28 ते इ.स. 40)
4) अझस् दुसरा (इ.स. 35 ते 79)
भारतावर राज्य करणारा शकांचा पहिला श्रेष्ठ राजा मऊस हा होय.
त्याच्या कालखंडासंबंधी निश्चित माहिती सांगता येत नाही. काहींच्या मते तो सर्वसाधारणपणे इ.स.पू. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेला असावा.
तक्षशिलेच्या ताम्रपटावरून मऊससंबंधीची माहिती मिळते. तो स्वतःला 'महाराजाधिराज' म्हणवीत असे. पंजाल, गांधार या परिसरात त्यांची नाणी सापडतात.
X X
शक क्षत्रपांची घराणी
शक क्षत्रपाचे प्रामुख्याने दोन गट पडतात.
1) पश्चिमी क्षत्रप:पश्चिमी क्षत्रपात खालील क्षत्रपांचा समावेश होतो.
1) उज्जैनीचे क्षत्रप,
2) महाराष्ट्रातील क्षत्रप,
2) उत्तर क्षत्रप: उत्तर क्षेत्रपात खालील क्षत्रपांचा समावेश होतो.
1) तक्षशिलेचे क्षत्रप.
2) मथुरेचे क्षत्रप,
तक्षशिला व मथुरा येथील क्षत्रप हे फारसे प्रभावी नव्हते.


1 Comments
Nice sirji
ReplyDelete