Tools of Ancient Indian History: Archiological tools-Coin and Graphs
प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने: पुरातत्त्वीय साधने
( नाणी, आलेख )-1
प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वीय साधने, नाणी, आलेख, लिखित साधने, परकीयांचे इतिवृत्त इ. साधनांचा उपयोग होतो.
X X
पुरातत्त्वीय साधने:
पुरातत्त्वीय साधनांना भौतिक साधने असेही म्हणतात.
प्राचीन भारतीयांनी पुरातत्त्वीय किंवा भौतिक साधनांचे प्रचंड भांडार मागे ठेवले आहे.
दक्षिण भारतातील दगडी मंदिरे आणि पूर्व भारतातील विटांनी बांधलेले विहार किंवा मठ आजही प्राचीन काळातील वास्तुकलेच्या वैभवांची साक्ष देत उभे आहेत.
परंतु त्यापेक्षा कितीतरी वास्तू जमिनीच्या उदरात गडप झाल्या आहेत. जिथे या वास्तू जमिनीत गाडल्या गेल्या तिथे उंचवटे तयार झाले. असे उंचवटे भारतभर विखुरलेले आहेत.
यापैकी काही उंचवट्यांखाली एका संस्कृतीचे, काही उंचवट्यांखाली एकापेक्षा जास्त संस्कृतीचे तर काही उंचवट्यांखाली महत्त्वाच्या संस्कृतीचे अवशेष दडलेले आहेत.
X X
काही उंचवटे रंगीत मृद्भांड संस्कृतीचे * (रंगीत मृदू किंवा मातीच्या भांड्यांची संस्कृती), काही सातवाहन संस्कृतीचे तर काही कुशाण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.
ज्या उंचवट्यांखाली महत्त्वाच्या संस्कृतीचे अवशेष दडले असतात तिथे इतरही संस्कृतीचे अवशेष असतात. परंतु त्या संस्कृती गौण किंवा कमी महत्त्वाच्या असतात. जे उंचवटे एका पेक्षा जास्त संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात तेथे एकाखालोखाल एक असे क्रमाने संस्कृतीचे थर आढळतात. पुष्कळदा असे थर परस्परात मिसळून गेलेले आढळतात.
उंचवट्यांचे उत्खनन उभा छेद देऊन व आडवा छेद देऊन असे दोन प्रकारे केले जाते.
उभा छेद एका विशिष्ट भागापुरताच मर्यादित असतो तर आडव्या छेदात संपूर्ण उंचवट्यांचेच उत्खनन केले जाते.
यामुळे उत्खनन करणाऱ्या संशोधकाला उंचवट्यांखाली दडलेल्या एखादया संस्कृतीची संपूर्ण कल्पना येते.
आज भारतात जे विविध ठिकाणी उत्खनन झाले आहे ते उभा छेद देऊन झाले आहे. असे उत्खनन एक तर तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चाचे असते शिवाय अशा उत्खननात आढळलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचा कालानुक्रम लावणे सोपे असते.
आडवा छेद देऊन करण्यात येणारे उत्खनन अत्यंत खर्चिक असल्याने अशा प्रकारचे उत्खनन तुरळक स्वरूपात होते. शिवाय अशा उत्खननाचे निर्णय तत्कालीन भौतिक जीवनावर प्रकाश टाकण्यास अपुरे ठरतात.
वायव्य भारत, पश्चिमउत्तर प्रदेश व राजस्थान या भागातील हवामान शुष्क असल्याने तेथील उत्खननात मिळालेले पुरातन अवशेष बरेचसे सुस्थितीत आहेत.
परंतु गंगेचे खोरे, त्रिभुज प्रदेश येथील हवामानात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने तेथील उत्खननात सापडलेल्या लोखंडाच्या वस्तू गंजलेल्या आहेत. शिवाय तेथील मातीचे बांधकामही सुस्थितीत नसल्याने तेथील संस्कृतीचा अभ्यास करताना अभ्यासकांसमोर अनेक अडचणी उद्भवतात.
अशा उत्खननात आढळून आलेले पक्क्या विटांचे व दगडांचे बांधकाम मात्र त्या भागातील प्राचीन संस्कृतीवर पर्याप्त प्रकाश टाकतात.
वायव्य भारतात जे उत्खनन झाले त्यात इ.स.पू. 2500 वर्षाच्या संस्कृतीचे अवशेष आढळून आले आहेत.
गंगेच्या खोऱ्यातील उत्खननामुळे तेथील प्राचीन संस्कृतीच्या भौतिक जीवनाची कल्पना येते. या उत्खननांमुळे तत्कालीन घरांसाठी वापरण्यात आलेले साहित्य, घरांचे आकार व त्यांची रचना, वापरण्यात येणारी भांडी, अवजारे, अन्न इ.ची कल्पना येते.
X X
दक्षिण भारतातील काही भागात मृत व्यक्तीबरोबर तिची भांडी-कुंडी, अवजारे, हत्यारे व वापरावयाच्या इतर वस्तू पुरल्या जात. अशा थडग्यांभोवती मोठमोठ्या दगडांना रचून त्यांचे आवरण तयार केले जाई. अशा बांधकाम रचनेला 'महापाषाणी' (Megaliths) रचना म्हणतात.
प्राचीन उंचवट्यांचे शास्त्रशुद्ध उत्खनन करण्याच्या शास्त्राला 'पुरातत्त्व विज्ञान' किंवा 'पुरातत्त्वशास्त्र' (Archaeology) म्हणतात.
उत्खनात मिळालेल्या वस्तूंच्या अवशेषांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने परीक्षण केले जाते. त्यानुसार त्यांचा काळ ठरविला जातो. त्या पद्धतीला रेडियो कार्बन 'पद्धती म्हणतात.
या पद्धती मागील गृहित सूत्र असे की प्रत्येक जीवित घटकांत कार्बन असतो. जेव्हा तो जीवित घटक मृत होतो तेव्हा त्याची विशिष्ट प्रकारचा कार्बन ज्याला C14 म्हणतात, तो ग्रहण करण्याची शक्ती संपुष्टात येते. व त्या वस्तूत असलेल्या C14 च्या -हास प्रक्रियेला सुरवात होते. त्याला 'उत्सर्जन प्रक्रिया' म्हणतात.
C 14 हा C12 चा रेडियोधर्मी घटक आहे. कोणत्याही जीवित घटकात C 14 आणि C12 हे समप्रमाणात असतात. C14 चा किती प्रमाणात -हास झाला हे C12 चे प्रमाण किती आहे त्यावरून ठरविता येते. तसेच त्या -हास प्रक्रियेसाठी किती कालावधी लागला त्यावरून त्या वस्तूचा काळ ठरविता येतो.
ज्या वस्तुत C14 चे प्रमाण कमी आढळते ती निश्चितच जास्त प्राचीन असते व ज्या वस्तूत C14 चे प्रमाण जास्त असते ती तुलनात्मकदृष्ट्या अलीकडच्या काळातील असते.
X X
एखादया मृत घटकातील पन्नास टक्के C14 बाहेर पडण्यास 5568 वर्षे लागतात. शिल्लक असलेल्या C14 वरून त्या वस्तूचे वय ठरविता येते.
वनस्पतीचे अवशेष आणि परागकणांच्या पृथःकरणावरून वातावरण आणि वनस्पतीचा अभ्यास केला जातो. या अभ्यासावरून काश्मीर आणि राजस्थान या प्रदेशात इ. स. पू. 7000 ते 6000 च्या आसपास शेती होत असल्याचे दिसून येते.
उत्खननात ज्या धातूंच्या शिल्पाकृती आढळून येतात त्यातील धातूंचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्या कुठे प्राप्त झाल्या तसेच धातुतंत्र कसे विकसित झाले ते ठरविला जाते.
प्राण्यांच्या सापडलेल्या अस्थीवरून ते प्राणी पाळीव होते का, तसेच त्यांचा कोणत्या प्रकारच्या कामासाठी उपयोग होत होता ते ठरविले जाते.
X X
नाणी:
प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी बरीच नाणी जमिनीच्या पृष्ठभागावर सापडली आहेत.
उत्खननातही भरपूर नाणी आढळून आली. नाण्यांच्या अभ्यासाच्या शास्त्राला 'नाणेशास्त्र' (Nu- mismatics) म्हणतात.
प्राचीन भारतात आजच्याप्रमाणे कागदी चलन नव्हते. प्राचीन नाणी ही सुवर्ण, रजत, ताम्र व शिशापासून बनविली जात.
ही नाणी बनविण्यासाठी भाजलेल्या मातीचे साचे बनविले जात. असे साचे फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यातील बहुतेक साचे कुशाण काळातील म्हणजे इ.स. च्या पहिल्या तीन शतकातील आहेत.
X X
गुप्तोत्तर काळात अशा साच्यांचा वापर जवळ जवळ संपुष्टात असलेला दिसतो.
प्राचीन काळी आजच्यासारखी बँक व्यवस्था नव्हती. त्या काळातील लोक नाणी माती किंवा पितळेच्या पात्रात सुरक्षित जागी ठेवित व गरजेनुसार त्याचा वापर करीत.
अशा पात्रात ठेवलेली भारतीय तसेच रोमन नाणी देशाच्या निरनिराळ्या भागात आढळून आलेली आहेत.
त्यापैकी बरीचशी नाणी कोलकाता, पाटणा, लखनौ, दिल्ली, जयपूर, मुंबई, मद्रास येथील वस्तुसंग्रहालयात जपून ठेवण्यात आली आहेत.
बरीचशी भारतीय नाणी नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान येथील वस्तूसंग्रहालयात जपून ठेवली आहेत.
इंग्रजांनी भारतावर राज्य केले असल्याने इंग्लंडमध्ये ही बरीच भारतीय नाणी खाजगी व सार्वजनिक वस्तूसंग्रहालयात आढळून येतात.
भारतातील महत्त्वाच्या राजघराण्यांच्या नाण्यांची एक सूची तयार करण्यात येऊन ती प्रकाशित करण्यात आली आहे.
भारतीय नाण्याची सूची कोलकाता व लंडनच्या वस्तुसंग्रहालयात आज उपलब्ध आहे.
X X
अगदी सुरवातीच्या भारतीय नाण्यांवर काही चिन्हे किंवा प्रतीके आढळून येतात. परंतु त्यानंतरच्या भारतीय नाण्यांवर राजांची व देवतांची नावे तसेच तारखा आढळून येतात.
ज्या परिसरात ही नाणी आढळून आलीत त्यावरून त्या भागात ही नाणी व्यवहारात होती हे दिसून येते. या आढळलेल्या नाण्यांवरून अनेक राजकीय वंशावळ्यांचा तसेच उत्तर अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या इंडो ग्रिकांचा इ. स. पू. दुसऱ्या व पहिल्या शतकातील इतिहास समजण्यास मदत होते.
नाणी देशाच्या आर्थिक इतिहासावर पर्याप्त प्रकाश टाकतात. काही नाणी राज्यकर्त्यांच्या आदेशानुसार व्यापाऱ्यांच्या श्रेणी व सुवर्णकारांद्वारे प्रचारात आणली जात. त्यामुळे व्यापाराला चालना मिळे.
सर्वात जास्त नाणी मौर्योत्तर काळातील आढळून आली आहेत. ही नाणी सुवर्ण, रजत, ब्राँझ, तांबे, शिसे व मिश्र धातूची होती.
गुप्तकाळात सुवर्णाच्या नाण्यांचा वापर सर्वात जास्त होता. या सर्वावरून मौर्योत्तर काळात व गुप्तकाळातील काही ठराविक काळात व्यापाराची अत्यंत भरभराट झाली होती है दिसून येते.
गुप्तोत्तर काळातील फार थोडी नाणी आढळून आली आहेत. त्यामुळे या काळात भारतीय व्यापाऱ्याला ओहोटी लागल्याचे दिसून येते.
नाण्यांवर राजांच्या व देवतांच्या प्रतिमा तसेच निरनिराळी प्रतीके आढळून येतात. त्यावरून त्या काळातील कला व धार्मिक श्रद्धांची कल्पना येते.
X X
आलेख:
प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाच्या साधनांमध्ये आलेखांना नाण्यापेक्षा जास्त महत्त्व आहे. आलेखांच्या अभ्यासाला 'पुराभिलेखशास्त्र' (Epigraphy) म्हणतात.
या आलेखांवरील प्राचीन लिपी व इतर उल्लेख यांच्या अभ्यासाच्या शास्त्राला 'पुरालिपीशास्त्र' (Palaeography) म्हणतात.
हे आलेख शिक्के, दगडी स्तंभ, खडक, ताम्रपट, मंदिरांच्या भिंती, विटा व प्रतिमांवर कोरलेले आढळून आले आहेत.
भारतातील सर्वात प्राचीन आलेख हे दगडांवर कोरलेले आहेत. इ.स.च्या सुरवातीपासून यासाठी ताम्रपटांचा वापर होताना दिसतो. परंतु याही वेळेस दक्षिण भारतात दगडांवर आलेख कोरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू होती.
दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर कोरलेले आलेख आजही सुस्थितीत आहेत.
नाण्यांप्रमाणेच देशातील निरनिराळ्या वस्तुसंग्रहालयात आलेख सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
सर्वात जास्त आलेख म्हैसूरच्या पुराभिलेख संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.
सर्वात प्राचीन आलेख हे प्राकृत भाषेत असून ते इ.स.पू. तिसऱ्या शतकातील आहेत.
इ.स.च्या दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या शतकात आलेखासाठी संस्कृत भाषेचा वापर फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला. या काळात प्राकृत भाषेतही तुरळक प्रमाणात आलेख कोरले जात होते.
इ.स.च्या 9 व्या आणि 10व्या शतकात प्रादेशिक भाषांमध्ये आलेख रचले जाऊ लागले.
X X
मौर्य, मौर्योत्तर आणि गुप्तकाळातील आलेखांची सूची तयार करण्यात येऊन प्रकाशित करण्यात आली आहे. गुप्तोत्तर काळातील आलेख मात्र शास्त्रशुद्धरीत्या सूचिबद्ध केलेले नाहीत.
दक्षिण भारतातील आलेखांची स्थलानुसार सूची तयार करण्यात आली आहे. तरीही 50,000 पेक्षा जास्त आलेख प्रकाशनाच्या प्रतीक्षेत पडून आहेत.
हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्र लिपी असून त्यात चित्रांच्या व चिन्हांच्या माध्यमातून आशय व कल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. लिपी वाचण्यात संशोधकांना अजूनपर्यंत यश आले. नाही.
अशोकाचे आलेख हे ब्राह्मी लिपीत कोरलेले असून ते डावीकडून उजवीकडे लिहिण्यात आले आहेत तर त्याचे काही आलेख खरोष्टी लिपीत असुन ते उजवीकडून डावीकडे लिहिण्यात आले आहेत.
भारताचा वायव्य भाग वगळता ब्राह्मी लिपी संपूर्ण भारतात प्रचलित होती.
आजच्या पाकिस्तान व अफगाणिस्तानात अशोकाचे आढळून आलेले आलेख ग्रिक आणि अरेमिक लिपीत कोरलेले आहेत. गुप्तकाळापर्यंत ब्राह्मी हीच भारतातील मुख्य लिपी होती. त्यामुळे इ.स. सातव्या शतकापर्यंतचे आलेख वाचण्यात पुरालिपी तज्ज्ञांना विशेष अडचणी येत नाहीत. परंतु इ.स. सातव्या शतकानंतर जे आलेख कोरले गेले त्यांच्यात प्रादेशिक लिपीचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाल्याने त्यांचे वाचन करण्यात अनेक अडचणी येतात.
सर्वात प्राचीन आलेख इ.स.पू. 2500 च्या आसपासचे असून ते हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांवर आढळून येतात. आजतागायत त्यांना वाचण्यात संशोधकांना यश आलेले नाही. ज्या आलेखांचे वाचन करण्यात अभ्यासकांना यश आले आहे त्यापैकी सर्वात प्राचीन आलेख इ.स.पू. तिसऱ्या शतकातील सम्राट अशोकाचे आहेत.
X X
फिरोजशहा तुघलकला मेरठ आणि हरियाणात टोपरा येथे अशोकाचे स्तंभलेख मिळाले. त्याने ते दिल्ली येथे आणून ते पंडितांकडून वाचण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्याला अपयश आले.
पुढे 18 व्या शतकात ब्रिटिशांना अशोकाचे आलेख आढळलेत पण त्यांनाही ते वाचण्यात अपयश आले.
इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीतील एक सनदी नोकर जेम्स प्रिंसेप हा अशोकाच्या आलेखांचे अचूक वाचन करणारा पहिला अभ्यासक होय.
आज उपलब्ध असलेल्या आलेखांचे आपण निरनिराळ्या गटात वर्गीकरण करू शकतो. काही आलेखांमध्ये प्रशासकीय अधिकारी व सर्वसामान्य जनतेसाठी राजाज्ञा व निर्णय असून त्यात सामाजिक, धार्मिक व प्रशासकीय बाबींचा समावेश आहे.
X X
इतर आलेखांमध्ये बौद्ध, जैन, वैष्णव, शैव, इ. धर्म पंथांच्या उपासकांचे भक्तीपर संदेश आहेत. ते स्तंभ, शिला, मंदिरे, प्रतिमा यावर कोरण्यात आले आहेत. काही आलेखावर शासकांच्या विजयांच्या व पराक्रमाच्या नोंदी आहेत. त्यात शासकाचे पराभव व त्यांच्या उणिवा यांचा अभाव आढळतो.
समुद्रगुप्ताचा 'अलाहाबाद प्रशस्ती ' याचे उत्तम उदाहरण आहे. याशिवाय काही आलेख दानपत्राच्या स्वरूपाचे आहेत. त्यात राजे, व्यापारी व कारागीर यांनी पैसा, पशू, जमिनी दान दिल्याचे उल्लेख आहेत.
शासक व राजकीय प्रमुखांनी दिलेली दानपत्रत्त प्रामुख्याने तांब्याच्या पत्र्यावर कोरली असून त्या वरून तत्कालीन जमीन व्यवस्था व प्रशासन पद्धती यांचा अभ्यास करण्यास मदत होते.
या दानपत्रात दान दिलेल्या जमिनी, त्यावर आकारण्यात येणारा महसूल, साधू, धर्मगुरू, मंदिरे, मठ, अधिकारी व व्यक्तींना दानात दिलेल्या जमीनी इ. चा उल्लेख आहे. ही दानपत्रत्त प्राकृत, संस्कृत, तामिळ, तेलुगू इ. भाषांत आढळून येतात.
ताम्रपट
X X
Comment and share

3 Comments
Nice
ReplyDeleteNice information
ReplyDeleteVery nice information
ReplyDelete