Subscribe Us

header ads

Vedic Literature: वैदिक वाङमय

 वैदिक वाङमय

Vedic Literature




वैदिक संस्कृतीची भरपूर भरीव माहिती उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे साधन म्हणजे " वैदिक वाङमय " हे आहे.

1. संहिता. 2. ब्राह्मणे, 3. आरण्यके आणि 4. उपनिषदे 5. वेदांगे

1.संहिता 

यामध्ये 1. ऋग्वेद ,2. यजुर्वेद, 3.सामवेद व 4.अथर्ववेद या चार वेदांचा समावेश होतो.

2.ब्राह्मणे

वैदिक वाङमयाचा दुसरा मोठा भाग ब्राह्मण ग्रंथांचा आहे . साहित्तोतर काळात मंत्र व त्यांच्या यज्ञ कर्मातील विनियोग स्पष्ट करण्यासाठी काही ऋषींनी ग्रंथ लिहिले त्यास " ब्राह्मणग्रंथ" म्हणतात .

ब्राह्मण ग्रंथांना "यज्ञशास्त्र" ग्रंथ असेही म्हणतात.

 प्रत्येक वेदाशाखेचे ब्राह्मण ग्रंथ आहेत. त्यामध्ये ऋग्वेदाचे एतरेय व शांखायन, सामवेदाचे तांडय, षडविश व जैमिनीय, कृष्ण यजुर्वेदाचे तैततरी, शुक्ल यजुर्वेदाचे शतपथ अथर्ववेदाचे गोमी हे ब्राह्मण ग्रंथ आहेत . चातूर्वरण्ये पद्धती व प्रत्येक वर्णाचे हक्क, कर्तव्य ,मर्यादा निश्चित करण्याचे काम ब्राह्मण ग्रंथांनी केले आहे. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे ऋषींनी केलेले वेदांवरचे भाषण होय.

 तत्कालीन धर्म समजुती व सांस्कृतिक प्रगती यांची माहिती ब्राह्मण ग्रंथातून मिळते. 

 भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता, यज्ञसंस्थेचे महत्त्व, धर्मशास्त्र तत्वज्ञान इत्यादी अनेक विषयांच्या अभ्यासासाठी ब्राह्मण ग्रंथांचे अध्ययन आवश्यक ठरते.

X X

3.आरण्यके

ब्राह्मण ग्रंथाचा उत्तर भाग म्हणजे आरण्यके होत. वानप्रस्थाश्रमात असतांना यज्ञ विधींचे पालन करणे अशक्य असे .

 त्यामुळे ऋषीमुनी आपला जास्तीत जास्त वेळ ध्यानधारणा, मनन-चिंतन यात घालवत .हे तत्वचिंतन प्रशांत अरण्यामध्ये करावयाचे असल्याने या चिंतनातून हे साहित्य निर्माण झाले त्यास "आरण्यके" म्हणतात . 

शिष्याने अरण्यात जाऊन ही विद्या प्राप्त करावी अशी या ग्रंथाची अपेक्षा आहे. वेदातील गुढ तत्त्वज्ञान समजावून सांगणारा ग्रंथ म्हणून आरण्यकाना महत्त्व आहे.

 ऋग्वेदाची एतरेय व शांखायन, शुक्ल यजुर्वेदाची माध्यंदिन, बृहदारण्यक व कण्व बृहदारण्यक,  कृष्ण यजुर्वेदाचे तैतरिय व सामवेदाचे तलवकार आरण्यक ही आरण्यके आहेत.

4.उपनिषदे

"उपनिषद" म्हणजे जवळ बसणे. गुढ ज्ञानाची शिक्षा घेण्यासाठी शिष्याने गुरू जवळ बसणे हा उपनिशदाचा अर्थ आहे.

 अशावेळी जे ज्ञान दिले जाते त्यास उपनिषद म्हणतात. भक्ती, कर्म, तप हा उपनिषदांचा प्रमुख विषय नाही तर ज्ञान आहे. 

उपनिषदे ही ब्राह्मण ग्रंथाची अंतर्भुत अंगे आहेत ब्राह्मण ग्रंथांच्या अंती येतात म्हणून त्यांना" वेदांत" म्हणतात.

 वैदिक ज्ञानाचा अंतिम निष्कर्ष व ध्येय त्यात सांगितले आहे. उपनिषदांच्या संख्येबाबत मतभेद आहेत. 

वेबर च्या मते, 

एकूण उपनिषदे 235 आहेत. मुक्तीकोपनिषदात 108 उपनिषदे असल्याचा उल्लेख आहे. यात ईश, केन, कढ, प्रश्न, मुंडक ,मांडुक्य,  तैतरीय, छांदोग्य, बृहदारण्यक ही 10 उपनिषदे महत्त्वाची व जुनी मानली जातात.

 उपनिषदात आत्मज्ञानाची गरज प्रतिपादन केली आहे . जीव व विश्व यांचे अंतिम स्वरूप मोक्षप्राप्तीचा मार्ग इत्यादी विषयांची चर्चा त्यात आहे. 

भक्ती,तप , संन्यास, आत्म्यांचे विविध योनीतील भ्रमण, पुनर्जन्म सिद्धांत इत्यादींचे विवरण आहे, उपनिषदांची भाषा साधी सुबोध आहे.

 जर्मन तत्त्वज्ञ शोपेनहॉवर म्हणतो, 

" उपनिषदे माझ्या जीविताची शांती आहे व मृत्यू समयी ही उपनिषदे मला शांती देतील."

X X

5.वेदांगे

वेदांगे ही सहा आहेत व ती वेदांची पूरक शास्त्रे आहेत. वेदांगे वेदांच्या अभ्यासाला अंगभूत असल्याने त्यास "वेदांगे" म्हणतात.

1. शिक्षा : यात वेदांगा च्या स्पष्ट विचारांचे नियम दिले आहेत.

2. कल्प : यात यज्ञा विषयक विधी व नियम आहेत. कल्प सूत्रांचे चार भाग आहेत.

1. श्रोतसूत्रे : यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या यज्ञाचे नियम आहेत. परंतु श्र्वेतयाग खर्चिक असल्याने श्रोतसूत्रांचा उपयोग श्रीमंत वर्गातच होई.

2. गृहसुत्रे : यात गृहस्थाने लहान प्रमाणात घरात करावयाच्या यज्ञाचे नियम दिले आहेत. गृहस्थाश्रमी पुरुषाने करावयाचे विधी आचार यात आहेत.

3. धर्मसूत्रे:  यात वैयक्तिक व सामाजिक सार्वजनिक जीवनात पाळावयाचे नीती नियम आहेत.

4. सुलभसूत्रे: यज्ञविधी यांचे प्रकार व रचना यात आहेत.

3. व्याकरण : यात संस्कृत भाषेच्या व्याकरणाची चर्चा केली आहे.

4. निरुक्त : यात शब्दांची उत्पत्ती कशी झाली ,शब्दांचे धातू व त्यांचे अर्थ याविषयी चर्चा केलेली आहे.

5. छंदशास्त्र : वैदिक मंत्र तालासुरावर म्हटले तरच इच्छित फलप्राप्ती होते. कोणत्या इच्छापूर्तीसाठी कोणते मंत्र तालासुरावर म्हणावयाचे ते यात सांगितले आहेत.

6. ज्योतिषशास्त्र : यात यज्ञ करण्याची योग्य वेळ कोणती याची तपशीलवार चर्चा आहे. तसेच महिने व वर्ष चंद्र-सूर्य यांची गती यांचीही चर्चा यात केली आहे.

X X

7. षड्दर्शन:  वेदांगा बरोबरच षड्दर्शनाचाही समावेश वैदिक साहित्यात केला जातो . ही दर्शने सहा आहेत.

1. न्याय दर्शन - याचा रचयिता गौतम आहे.

2. वैशंषिक दर्शन - याचा रचयिता कनादा आहे.

3. सांख्यदर्शन - याचा रचयिता कपिलमुनी आहे.

4. योगदर्शन - याचा रचयिता पतंजली आहे.

5. पूर्वमीमांसादर्शन - यांचा रचयिता जैमिनी आहे.

6. उत्तरमीमांसादर्शन - याचा रचयिता बादरायण आहे.


संपूर्ण वैदिक वाङमय एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी निर्माण झालेले नाही. 

मध्य एशिया, सप्तसिंधू व मध्य देश हे तीन प्रदेश वेदांच्या निर्मितीचे स्थान म्हणून समजावयास हरकत नाही . 

अत्यंत प्राचीन अशा ऋचा, मंत्र व ब्राह्मण ग्रंथ हे सर्व इतका प्रदीर्घ काळ सुरक्षित कसे राहिले याचे आश्चर्य वाटते.

मुळच्या वेदमंत्रात कोणत्याही प्रकारचा बदल होऊ नये यासाठी प्राचीन ऋषींनी अनेक  क्लुप्त्या योजल्या होत्या. 

मंत्राचा स्वर चुकल्यास तो मंत्र वज्र होऊन यजमानाचा घात करतो. असे पाणिनीय शिक्षेत म्हटले आहे.

 म्हणूनच वेदांचे अध्ययन शास्त्रशुद्ध रीतीने करून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी एका वर्गाकडे सोपवली होती. वेदांचे 

आधुनिक भारतातील भाष्यकार म्हणून दयानंद सरस्वती यांचा उल्लेख केला जातो.

 वेदांचा अभ्यास अनेक पद्धतीने करून भारतीय संस्कृती, धर्म व समाज यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आधुनिक काळात अनेक विद्वान करीत आहेत.






Comments and share...


Post a Comment

8 Comments