Subscribe Us

header ads

Remedies of Conservation of Biodiversity: जैवविविधतेच्या संवर्धनाचे उपाय

 जैवविविधतेच्या संवर्धनाचे उपाय 

Remedies of Conservation of Biodiversity 


1. कायदे  Acts

2. जैव तंत्रज्ञान

Biotechnology  

जैविक उत्पादने आणि प्रक्रिया यांच्या मूल्यवर्धन यासाठी जैवतंत्रज्ञान वापरले जाते. भारत सरकारने जैवतंत्रज्ञानाच्या प्रयोगासाठी विविध प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. जैवतंत्रज्ञान हा संवर्धन आणि जनुकीय वैविध्याचा चिरस्थायी वापर यातील एक महत्त्वाचा दुवा आहे.

 राष्ट्रीय जैवविविधता कृती योजनेची रचना करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. जैवविविधतेचे जतन, संवर्धन आणि तिचा सातत्यपूर्ण वापर करण्याचे तंत्र अमलात आणणे व त्यामध्ये निगडित असलेल्या परिस्थितिकीय प्रक्रिया आणि प्रणाली यांचे व्यवस्थापन करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. अनेक शासकीय वन सेवाभावी संस्था आणि व्यक्तींच्या सहभागातून या योजनेचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

3. स्थानिक ज्ञानाची नोंद करणे

Record of the Local Knowledge 

स्थानिक लोकांची जीवन पद्धती आणि पर्यावरण यांचे घनिष्ठ संबंध दिसून येतात. स्थानिक रहिवासी त्यांच्या गरजांसाठी पर्यावरणातील संसाधनांवर अवलंबून असतात. त्यांच्याकडे असलेल्या वनस्पती आणि प्राणी या विषयाच्या ज्ञानाचा समृद्ध साठा जैवविविधतेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरतो. हे ज्ञान बहुतांशी तोंडी स्वरूपातच एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला दिले जाते. म्हणून हे ज्ञान नष्ट होण्यापूर्वीच त्याची नोंद होणे आणि जतन होणे आवश्यक आहे. अनेक संघटनांनी अशी माहिती संकलित करून त्यांची नोंद ठेवण्यास सुरुवात केलेली आहे.

X X

4. जैवविविधता संवर्धनातील जनसहभाग

Public Awareness in Conservation of Biodiversity 

जैवविविधता संवर्धन कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापन आणि निरीक्षण यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग असल्याशिवाय कोणत्याही कायदेशीर तरतुदी प्रभावी ठरू शकत नाहीत. यासाठी शासकीय आणि स्वयंसेवी संस्था अनेक उपक्रम हाती घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने गावानजीकच्या निकृष्ट जंगल जमिनीवर जंगलांचे पुनरुज्जीवन आणि संरक्षण करण्यासाठी गावातील लोकांच्या सहभागावर भर दिला जातो. 

जैवविविधता संवर्धन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक लोकांचा विश्वास आणि सहभाग असणे आवश्यक आहे. याची जाणीव आता निर्माण झालेली आहे.

5. कृत्रिम संग्रह

Artificial Stocking 

ज्या जिवांच्या जाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा जातींचा संग्रह करून ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा संग्रह अशाच ठिकाणी केला पाहिजे. जर संग्रहित जीवांची संख्या अति जास्त  झाली तर परत समस्या निर्माण होतात. अशा प्रकारच्या समस्या ऑस्ट्रेलियात सशांचे संग्रहण केल्यामुळे निर्माण झाली होती.

6. शिकारीवर प्रतिबंध

Restricted Hunting 

सद्यपरिस्थितीत शिकार हा व्यवसाय करणे अशाच ठिकाणी शक्य आहे की जेथे वन्यजवांची घनता जास्त आहे. त्याच बरोबर त्याचा जनन दर उच्च आहे. अन्यथा वन्यजीवांचा त्रास होतो. म्हणून वन्यजीवांच्या शिकारीवर प्रतिबंध घालावा लागतो. कारण वन्य जीव निसर्गातील जैविक विविधतेचे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत.

X X

7. वन्यजीव संवर्धन कायदा

Wildlife Conservation Act 

भारत सरकारने वन्यजीवांच्या आणि नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धनासाठी विविध कायदे केले आहेत.

 वन्यजीवांच्या संरक्षण संदर्भात शिक्षण देण्यासाठी डेहराडून येथे " भारतीय वन्यजीव संस्थेची" स्थापना केली आहे.

 या संस्थेचा उद्देश अभयारण्य व वन्यजीवांच्या व्यवस्थेसंबंधी लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवसायिक शिक्षण देणे हा आहे.

8. राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांची स्थापना

Establishment of National Park and Sancturies 

भारतात वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणाच्या व संवर्धनाच्या हेतूने 566 अभयारण्ये व 86 राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केली गेली आहे.

 सन 2003 -04 च्या आकडेवारीनुसार त्यांचे एकूण क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 4.66 टक्के इतके आहे.





Comment and share.....



Post a Comment

6 Comments