Subscribe Us

header ads

National Parks and Sanctuaries in Maharashtra महाराष्ट्रातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने

 महाराष्ट्रातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने  

National Parks and Sanctuaries in Maharashtra 

     अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने हे महत्त्वाचे पर्यटन नैसर्गिक घटक आहेत. त्यांच्या विकासामुळे केवळ पर्यटनच नव्हे तर वन्य पशु पक्ष्यांचे संरक्षण होते ,संवर्धन होते. 

      पर्यावरण संतुलन राखले जाते. त्यांच्या अस्तित्वाने त्या वन प्रदेशाला एक आगळे सौंदर्य लाभते. त्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक अशा स्थळी येतात. यातून त्या स्थळांचा पर्यटन विकास साधला जातो.

 महाराष्ट्रातील अशी काही पर्यटन स्थळे आहेत.

1. ताडोबा अभयारण्य 

      विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात या अभयारण्याचे क्षेत्रफळ 117 चौरस किलोमीटर आहे . हे अभयारण्य घनदाट अरण्याने व्यापलेले आहे . यात लहान-मोठे तलाव आहेत .त्यात " ताडोबा तलाव" सर्वात मोठा आहे. पर्यटकांना राहण्यासाठी निवास व्यवस्था असून वन्य प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी वन खात्यातर्फे बस सेवा उपलब्ध केली जाते .यात वाघ ,सांबर ,हरणे, गवा, नीलगाय हे प्राणी हे प्राणी आढळतात.

2. नवेगाव राष्ट्रीय उद्यान 

     भंडारा जिल्ह्यात  हे उद्यान असून त्याचे क्षेत्रफळ 134 चौरस किलोमीटर आहे .या उद्यानाच्या मध्यभागी एक मोठे तळे आहे .हा भाग मोसमी वृक्षांनी व्यापलेला आहे. पानझडी वृक्षांची जंगले आहेत. येथे बिबटे ,अस्वल, नीलगाय, स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने आढळतात.

3. बोर अभयारण्य  

      बोरनदी धरण क्षेत्रात पसरलेले अभयारण्य जिल्ह्यात घनदाट अरण्य रानडुक्कर , चितळ प्राणी आढळतात.

4. नागझिरा अभयारण्य 

     भंडारा जिल्ह्यातील हे एक प्रसिद्ध अभयारण्य आहे. याचे क्षेत्रफळ 153 चौरस किलोमीटर असून या दोन मोठे तलाव आहेत. त्यामुळे येथे भरपूर पशु-पक्षी आढळतात. यात बिबट्या ,वाघ, चितळ ,गवे व पक्षी आढळतात.

5. मेळघाट अभयारण्य 

     अमरावती जिल्ह्यातील हे अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. याचे क्षेत्रफळ 900 चौरस किलोमीटर पसरले आहे. या भागात उंच पर्वत डोंगरदऱ्या असून हा भाग अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलातून सिपना, खंडू, खापरा, डोलर, गडगा या पाच नद्या वाहतात .त्यामुळे विविध प्रकारचे प्राणी व पक्षी येथे आढळतात.

X X

6. ढाकणा- कोळझाक वन्यप्राणी अभयारण्य 

      अमरावती जिल्ह्यात हे अभयारण्य असून सिपना व डोलर या नद्यांच्या खोऱ्यात पसरलेले आहे. या भागात उंच डोंगर रांगा व हिरव्यागर्द वनस्पतींनी व्यापलेला आहे. यात वाघ, गवे ,सांबर, रानकोंबड्या ,मोर हे पशु पक्षी आढळतात.

7. गौताळा अभयारण्य

      मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात हे अभयारण्य सुमारे 1200 एकरात पसरलेले आहे. यात वाढलेली झाडेझुडपे व सुमारे 18 लाख या अभयारण्यात झाडे लावलेली आहेत .यात वाघ ,बिबटे ,चितळ, अस्वल इत्यादी जातींचे प्राणी आढळतात.

8. पाल -यावल अभयारण्य 

     खानदेशातील जळगाव जिल्ह्यात हे अभयारण्य आहे .त्याचे क्षेत्रफळ 178 चौरस किलोमीटर असून ते पाल व यावल या दरम्यान पसरलेले आहे  या अभयारण्यात बिबट्या, रानमांजर, माकडे ,नीलगाय ,तरस, वाघ प्राणी तसेच मोर, रान कोंबडा ,बदक, चित्तर हे पक्षी सुद्धा आढळतात.

9. नांदूर मधमेश्वर अभयारण्य

      नाशिक जिल्ह्यात  हे अभयारण्य असून हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. गोदावरी व कारवा या नद्या वरील धरणामुळे या भागात पानथळीची क्षेत्र आढळतात. एका सर्वेक्षणानुसार 250 प्रकारचे  प्राणी याठिकाणी पाहायला मिळतात.

X X

10. रेहेकुरी अभयारण्य

      अहमदनगर जिल्ह्यातील हे अभयारण्य "काळवीट " यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे क्षेत्रफळ 225 चौरस किलोमीटर असून काळविटांचे (काळी हरणे) कळप येथे मुक्तपणे संचार करीत असतात. या ठिकाणी अनेक जातींची पक्षीही आढळतात. अशा प्रकारची काळवीट  फक्त भारतातच आढळतात .यासाठी महाराष्ट्र शासनाने हे अभयारण्य 1980 साली निर्माण केले.

11. माळढोक पक्षी अभयारण्य 

      सोलापूर जिल्ह्यात हे अभयारण्य असून याचे क्षेत्रफळ 180 चौरस किलोमीटर आहे .येथील हवामान शुष्क आहे. त्यामुळे या भागात माळढोक पक्षी मोठ्या संख्येने आढळतात.

12. किनवट अभयारण्य 

      नांदेड जिल्ह्यामध्ये  हे अभयारण्य असून याचे क्षेत्रफळ 325 चौरस किलोमीटर आहे. ही वैनगंगा नदीच्या खोर्‍यात पसरलेले आहे. हे घनदाट जंगल असून तेथे वाघ, बिबटे, अस्वल , चितळ, नीलगायी, हरणे इत्यादी वन्यप्राणी आढळतात.

13. कोयना अभयारण्य 

     सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध व महाराष्ट्राची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या कोयना जलविद्युत केंद्राच्या "शिवसागर" जलाशयाच्या भागात हे अभयारण्य आहे. याचे क्षेत्रफळ 425 चौरस किलोमीटर असून अत्यंत सुंदर व सुरक्षित अशा या अभयारण्यात वाघ, बिबट्या ,अस्वल, गवे ,हरणे प्राणी मोठ्या संख्येने आढळतात.

14.मायणी पक्षी अभयारण्य 

      सातारा जिल्ह्यात वडूज जवळ मायणी येथील " इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य "प्रसिद्ध आहे .येथे सैबेरियातील वगैरे अती दूरच्या प्रदेशातील स्थलांतरित पक्षी आढळतात.

15. सागरेश्वर अभयारण्य 

       सांगली जिल्ह्यातील अभयारण्य दहा चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले असून येथे पानझडी व काटेरी वृक्ष आढळतात.

16. चांदोली अभयारण्य

        हिंगोली जिल्ह्यात वारणा नदीवरील चांदोली धरणाच्या परिसरात असलेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ 215 चौरस किलोमीटर आहे .येथे मुबलक पाणी असल्यामुळे वाघ, गवे ,अस्वल असे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात.

X X

17. दाजीपूर (राधानगरी )अभयारण्य 

       कोल्हापूर जिल्ह्यात  हे अभयारण्य असून राधानगरी जवळ भोगावती खोऱ्यात गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. आहे राधानगरी धरणाच्या व दाजीपूर परिसरात घनदाट जंगल आहे .

काळपट व मातकट रंगाच्या या प्राण्यांच्या डोक्यावर काळसर टोकदार शिंगे असतात. गवा हा प्राणी हत्तीसारखा प्रचंड ताकतीचा असून त्याची शिकार करणे अतिशय अवघड व कौशल्याचे असते.

      कोल्हापूर ते शाहू महाराज गव्यांच्या शिकारी मध्ये तरबेज होते. त्यांनी कौशल्याने शिकार केलेले गवे भुसा भरून कोल्हापूरला महालक्ष्मी मंडपातील म्युझियममध्ये पाहण्यासाठी ठेवलेले आहेत.

18. कर्नाळा पक्षी अभयारण्य 

       मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातील हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे .दाट वनस्पती येथे दाट वनस्पती असून एक किल्लाही आहे. या ठिकाणी 150 पेक्षा जास्त जातींचे पक्षी आढळतात.

19 तानसा अभयारण्य

       ठाणे जिल्ह्यातील तानसा जलाशयाच्या परिसरामध्ये हे अभयारण्य सुमारे 300 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. येथे वाघ, बिबटे ,हरणे, लांडगे प्राणी व अनेक पशु पक्षी पाहायला मिळतात.

     तानसा धरणातून मुंबई शहराला पाणीपुरवठा होतो.

20.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 

     ठाणे जिल्ह्यातील बोरिवली जवळ असलेल्या या राष्ट्रीय उद्यानात निरनिराळे पशुपक्षी आढळतात.

21. भीमाशंकर अभयारण्य 

 पुणे जिल्ह्यामध्ये   हे अभयारण्य असून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे. हे घनदाट जंगलांनी व्यापलेले आहे. यात वाघ ,बिबटे, रान मांजर ,कुत्रे ,तरस आणि जंगली खारी ( शेकरू) आढळतात.








Comment and share..

Post a Comment

7 Comments