Subscribe Us

header ads

Jainism: Sects in Jainism. जैन धर्मातील पंथ व धर्मग्रंथ

Jainism: Sects in Jainism

जैन धर्मातील पंथ 



दिगंबर व श्वेतांबर :

हे दोन पंथ महावीर वर्धमान यांच्या मृत्यू नंतर पडले .

जैन धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे प्रारंभी सर्व अनुयायी दिगंबर (वस्त्रहीन )अवस्थेत राहत होते .

पण कालांतराने काही सुधारणावादी अनुयायांनी जैन धर्म सिद्धांतांची पुनर्रचना करून पांढरी वस्त्रे परिधान केली. अशाप्रकारे श्वेतांबर पंथ अस्तित्वात आला.

 दिगंबर पंथांचे लोक महावीरांच्या मूळ शिकवनिशी चिकटून राहिले. पण श्वेतांबर पंथाने हिंदू धर्मातील अनेक चालीरीती स्वीकारल्या.


X X

जैन वाड्मय - 

पूर्व (मूळ धर्म ग्रंथ ) :

जैन धर्माची मूळ शिकवण "पूर्व "नामक 14 धर्मग्रंथात आढळते ह्या 14 पूर्वात महावीराने आपली धर्म तत्वे अर्धमागधी प्राकृत भाषेत सांगितली. 

अंग ( श्वेतांबर पंथाचे धर्मग्रंथ) :

महाविरा नंतर 150 वर्षाच्या काळात जैन धर्म ग्रंथ व सिद्धांतांचे विस्मरण होऊ लागले .जैन धर्म ग्रंथ व अर्ध नियमांचे नवीनीकरण करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

 उत्तरेत पडलेल्या दुष्काळामुळे जैन संघाचा अध्यक्ष "भद्रबहू "काही अनुयायांसह कर्नाटकात धर्म प्रचारार्थ गेला असताना.

 त्याच्या अनुपस्थितीत त्याचा शिष्य "स्थूलभद्र" याने पाटलीपुत्र येथे इ. स. पूर्व चौथ्या शतकात एक "जैन परिषद" बोलावली .या परिषदेने जैनधर्मीय धर्म नियमांचे नवीनीकरण करून त्याप्रमाणे ग्रंथरचना करण्याचा निर्णय घेतला . या परिषदेतील अनुयायांनी पांढरी वस्त्रे परिधान केल्यामुळे  जैन धर्मात" श्वेतांबर" पंथ उदयास आला.

 त्यानंतर इ. सनाच्या 5 व्या शतकात "वल्लभी" येथे "दुसरी जैन परिषद " बोलावण्यात आली .जुन्या धर्म नियमांचे नवीनीकरण करण्यासाठी मथुरेचा "स्थंडील  "वल्लभीचा" नागार्जुन" यांच्यासारख्या विद्वान पंडित यांनी प्रयत्न केले.


X X

 या परिषदेत जैन धर्मग्रंथांची सुधारलेली नवी आवृत्ती पूर्ण झाली. या नवीन धर्मग्रंथास "अंग "असे म्हणतात.

 त्याची पुढील प्रमाणे सहा विभागात वर्गवारी करण्यात आली .

1. बारा अंगे    2. बारा उपांगे   

 3. दहा प्रकिर्ण

 4. सहा छेद सूत्रे.     5.चार मुलं सूत्रे    6.चार इतर ग्रंथ 

"अंग" वाड्मय "श्वेतांबर "पंथाचे धर्म वाड्मय असून दिगंबर पंथांचे वेगळे वाड्मय आहे.

दिगंबर पंथांचे धर्मग्रंथ :

दिगंबर पंथाने आपले स्वतंत्र वाड्मय प्राकृत व संस्कृत भाषेत तयार केले. या पंथात "कुंद्रकुडी" हा प्रसिद्ध विद्वान होऊन गेला.

इतर वाड्मय जैन धर्म पंडितांनी भाषा, हास्य ,चारित्र्य, कथा, व्याकरण ,गणित, शब्दकोश वगैरे स्वरूपात विविध भाषात विविध प्रकारची विपुल प्रमाणात वाड्मय निर्मिती केली. 

"हेमचंद्र "हा सर्वश्रेष्ठ विद्वान ग्रंथकार या धर्मात होऊन गेला.


X X

जैन स्थापत्य 

जैन अनुयायांनी निवासार्थ ठिकाणासाठी लेणी, गुहा, मंदिरे वगैरे स्वरूपात सुंदर शिल्पकृती निर्माण केल्या .

उदयगिरि ,वेरुळच्या लेण्यांमधील इंद्रसभा, गिरनार व पालीठाणा येथील मंदिरे ,अबू पर्वतातील दिलवारा मंदिर तसेच चित्तोड, पार्श्वनाथ वगैरे ठिकाणच्या शिल्पकृती कलापूर्ण जैन स्थापत्याची साक्ष देतात.

 मुस्लिम शासकांनी काही जैन शिल्प कृतींचा विध्वंस करून त्यांचे अवशेष मुस्लिम इमारतींना लावले .तर काही जैन शिल्प कृतींचे मुस्लिम शिल्प कृतीत रुपांतर केले .हे दिल्लीचा कुतुब मिनार तसेच अजमेर .कन्नोज वगैरे ठिकाणच्या इमारतीवरून स्पष्ट होते .

जैन धर्माच्या पतनाची कारणे:

जैन धर्मातील कडक धर्मनियम,  प्रचार यंत्रणेचा अभाव, बौद्ध धर्माचा उदय ,परिस्थिती सापेक्षतेचा अभाव व हिंदू धर्मातील चालीरीतींचा प्रभाव इत्यादी कारणांमुळे जैन धर्माचे पतन झाले.

 तरीपण आजही भारतात दिगंबर व श्वेतांबर पंथ मोठ्या प्रमाणात आहेत.

 






Comments and share...


Post a Comment

7 Comments

  1. धर्म म्हणजे धारण करणे या अर्थाने पाहीलं तर, किती सार्थक आहे, धर्माचा विचार... सकारात्मक आणि सुटसूटीत माहीती, thanks for this gyaan darshan🙏

    ReplyDelete
  2. अतिशय उत्तम माहिती

    ReplyDelete