Subscribe Us

header ads

Jainism: Teachings of Jainism जैन धर्माची शिकवण

Jainism: Teachings of Jainism

जैन धर्माची शिकवण



जैन धर्माची शिकवण खालील सिद्धांतावर आधारलेली आहे.

 1.त्रिरत्ने  2. कर्मनाश 3. ताप व क्लेश 4. वेद व देव अमान्य

1.त्रिरत्ने

1. सम्यक दर्शन 2. सम्यक ज्ञान 3. सम्यक चरित्र 

1. सम्यक दर्शन (योग्य श्रद्धा )

वर्धमान महावीर यांच्या सिद्धांतावर अनुयायांनी विश्वास ठेवून महावीरा वर श्रद्धा ठेवावी .

2. सम्यक ज्ञान (योग्य ज्ञान )

अनुयायांनी महावीराच्या धर्म तत्त्वांचे म्हणजेच शिकवणीचे योग्य ज्ञान करून घ्यावे.

X X

3.  सम्यक चारित्र्य (योग्य आचार)

 महावीरांच्या शिकवणीप्रमाणे अनुयायांनी योग्य आचरण करावे. योग्य आचरण ठेवण्यासाठी पुढील नियम पाळणे अनिवार्य आहे.

1.  सत्य 

सदा सत्य वदावे व चीतावे मिथ्या अचार -विचार त्यागावा.

2.  अहिंसा 

जैन धर्मात अहिंसेला श्रेष्ठ सदाचार व सदगुण मानतात. म्हणून आपल्या तन ,मन व वाणी द्वारा कुणालाही दुःख होऊ नये यासाठी अहिंसक आचार विचार व उच्चार यांचे काटेकोरपणे पालन करावे.

 सर्व विश्व जीवा बातम्यांनी भरलेले आहे. अन्न,पाणी, पाषाण, वनस्पती हवा वगैरे वस्तुत मानवाप्रमाणेच जीवआत्मे आहेत. यास्तव अहिंसा असण्यासाठी  अत्यंत काळजी घ्यावी.

3.अस्तेय 

चोरी करू नये .

4. अपरिग्रह

 संग्रह करू नये .अनुयायांनी कोणत्याही वस्तूचा साठा करू नये. सुख, स्वार्थ, सत्ता ,मत्ता व प्रतिष्ठा यांचा त्याग करावा.

5. ब्रह्मचर्य 

अविवाहित राहून कडक ब्रह्मचर्य पाळावे. तसेच वस्त्रे न वापरता दिगंबर रहावे . स्त्री संभोग करू नये.

X X

2. कर्मनाश 

कर्मामुळे जन्म-मृत्यूचे चक्र चालू असते. हे चक्र म्हणजे संसार प्रत्येक वस्तूत जीव असून जिवाचा जड वस्तू शी संबंध येऊन संसार निर्माण होतो .कर्मामुळे संसाराचे स्वरूप निश्चित होते. कर्मनाश केल्यास केवळ ज्ञान प्राप्त होते .म्हणून प्रत्येकाने कर्मनाश करण्याचा आटोकाट प्रयत्न करावा .त्यासाठी त्रीरत्नांचा अवलंब करावा.

3. तप व क्लेश 

जैन धर्माच्या शिकवणीत तप व क्लेश यांना अत्यंत महत्त्व आहे . इंद्रिय दमन करून कर्मनाश करण्यासाठी साध्या उपवासा पासून अत्यंत कठीण असे देहदंड व आत्मक्लेश सांगितले आहेत.

4.  वेद व देव अमान्य

 वर्धमान महावीर यांच्या धर्म सिद्धांतात वेद व देव यांना मुळीच स्थान नाही. वेदाद्वरा मोक्ष मिळतो. म्हणून ते श्रेष्ठ आहेत .हे महावीराला मुळीच मान्य नव्हते. तसेच त्याला ईश्वराचे अस्तित्व ही अमान्य होते.

5. धर्मप्रसार 

महावीरांच्या श्रेष्ठ सामाजिक स्थानामुळे जैन धर्माला राजाश्रय मिळाला. महविराने राजगृह, कौशाम्बी, उज्जैन ,श्रावस्ती वगैरे महत्त्वाच्या स्थानास भेटी देऊन आपल्या मताचा प्रचार केला.

 जैन धर्माच्या अनुयायांचे अनेक संघ तयार केले. पुरुष अनुयायांच्या संघ नायकास "गांधार "व स्त्री अनुयायांच्या संघनाइके "चांदण "असे म्हणत .

X X

नंतरच्या काळात नंद ,मौर्य वगैरे वंशातील अनेक राजांनी जैन धर्म स्वीकारला .

जसा बौद्ध धर्मात अशोक तसा जैन धर्मात राजा संप्रती प्रसिद्ध आहे त्याला "जैन अशोक" म्हणतात.

क्रमशः..







Comment and share

Post a Comment

8 Comments