Subscribe Us

header ads

Jainism:Vardhaman Mahavir वर्धमान महावीर- जैनधर्म

Jainism:Vardhaman Mahavir  

वर्धमान महाविर- जैन धर्म  

 ( इ. स. पूर्व 539 ते 467 ) 

वर्धमान महाविर: चोविसावे तीर्थकार

 "संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर"


“अहिंसा ही सबसे बड़ा धर्म है जो सबके कल्याण की कामना करता है.”

जैन धर्ममतानुसार महावीर वर्धमान हे जैन धर्माचे संस्थापक नसून चोविसावे तीर्थकर आहेत . 

तीर्थकर  म्हणजे जैन धर्माचा प्रणेता ,संत अथवा युगद्रष्टा निरनिराळ्या युगामध्ये जैन धर्माचे असे 24 तीर्थंकर होऊन गेले. त्यापैकी तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ आणि चोविसावे व शेवटचे तीर्थकर वर्धमान महावीर यांचे अस्तित्व ऐतिहासिकदृष्ट्या मान्यता पावले आहे. 

पण मथुरे जवळील काकालिटीला येथील उत्खननात मिळालेल्या जैन मुर्ती व स्तंभलेख आणि जैन ग्रंथ यावरून इतर तीर्थकारांचे ही अस्तित्व सिद्ध होण्याची आशा वाटते. 

X X

उदयगिरि (ओरिसा ) येथील गुंफेत पार्श्वनाथाच्या जीवनावर चित्रे कोरलेली आढळून आली. 

मद्रबाहूच्या कल्पसुत्राप्रमाणे पार्श्वनाथ हे क्षत्रिय असून बनारस चा राजा अश्वसेन यांचा मुलगा होय . त्याने इंद्रिय दमन व तपश्चर्या करून केवळ ज्ञान प्राप्त केले आणि आपल्या अनुयायाचा संघ स्थापन केला .सत्य ,अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह यावर पार्श्वनाथाची शिकवणूक आधारलेली होती. 

वर्धमान चे वाडवडील पार्श्वनाथयांचे अनुयायी होते .पार्श्वनाथाच्या शिकवणुकीत वर्धमान यांनी भर घातल्यामुळे जैन धर्माचा मूळ संस्थापक पार्श्वनाथ होय असे प्राध्यापक जॅकॉबी या इतिहासकारांचे मत आहे. 

पण जैन मताप्रमाणे भगवान वृषभनाथ हा जैन धर्माचा संस्थापक व पहिला तीर्थकर असून त्याचा पराक्रमी पुत्र भरत याच्या नावावरून आपल्या देशाला  भारत हे नाव पडले वेदात सुद्धा वृषभनाथा चा उल्लेख आढळतो. 

हिंदू धर्मग्रंथात वृषभनाथला विष्णूचा नववा अवतार मानले आहे .

अजितनाथ ,नेमिनाथ, अरहणाथ ,कुंतूनाथ वगैरे तीर्थकारांची नावे जैन ग्रंथात आढळतात. 

जैन धर्म अत्यंत प्राचीन असून तो बौद्ध व हिंदू धर्माहून वेगळा असला तरी त्या वेळी धार्मिक भेदभाव विशेष तीव्र नव्हते .

X X

महावीर वर्धमानाचे प्रारंभिक जीवन 

विदेहाची राजधानी वैशाली चे उपनगर कुंदग्राम येथे इ. स. पूर्व 539 मध्ये वर्धमान महावीर यांचा जन्म झाला. 

त्यांचे पिता सिद्धार्थ हा ज्ञातृक  नामक क्षत्रिय जमातीचा मुख्य होता. 

माता त्रिशला ही लिच्छवी राजा चेटक यांची बहिण होती. 

त्याचे लालन-पालन राजपुत्रा सारखे केले व त्यांचा यशोदा नावाच्या सौंदर्यशाली राजकन्येशी विवाह केला .

त्याला अनुजा अथवा प्रियदर्शना नावाची मुलगी होती .


गृहत्याग व जीन 

माता-पित्यांच्या मृत्यूनंतर वयाच्या 30  व्या वर्षी वर्धमाने गृहत्याग करून संन्यास घेतला. 

सर्वस्वाचा त्याग करण्याचे ठरवून अंगावरील वस्त्रे सुद्धा काढून टाकली.

दिगंबर अवस्थेत (नग्नावस्थेत) राहू लागला. त्याने दुःख व क्लेश भोगून इंद्रिय दमन करण्याचा मार्ग स्वीकारला. 

अशा अवस्थेत फिरत असताना लोक त्याला  हसू लागले , चीडवू लागले ,छळू लागले ,मारू लागले पण त्याने ते सहन केले . 

कित्येक दिवस अन्नपाणी न घेताच राहू लागला. ऊन ,पाऊस, थंडी ,वारा सहन करू लागला. त्याच्यावर अनेक संकटे आली. तरी पण तो निश्चयापासून ढळला नाही .

अशा तऱ्हेने 12 वर्षे उग्र तपश्चर्या केल्यावर वयाच्या 42 व्या वर्षी त्याला केवल ज्ञानाची प्राप्ती झाली .

X X

वर्धमान जीन बनला म्हणजे इंद्रिय जिंकणारा वर्धमान महावीर बनला .कारण वर्धामानाचने देहावर विजय मिळवून सुखदुःखाच्या शृंखल तोडल्या. 

त्याचे जन्म नाव वर्धमान असले तरी आता त्याला जीन  किंवा महावीर वर्धमान असे संबोधण्यात येऊ लागले . 

जीनाच्या (महावीराच्या ) अनुयायांना जैन जीनाच्या शिकवणीला जैन धर्म असे नाव पडले . 

त्याने ज्ञान प्रति नंतर तीस वर्ष आपल्या शिकवणीचा प्रचार केला व वयाच्या 72 व्या वर्षी पावा येथे इ. स.पूर्व 467 मध्ये मरण पावला. 



सत्य, अहिंसा और त्याग पर आधारित भगवान महावीर का तपस्वी जीवन व उनकी शिक्षाएं हमें धर्म के मार्ग पर चलकर मानवता की सेवा करने की प्रेरणा देती है।

महावीर जयंती की हार्दिक शुभकामनाएं

XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/10/blog-post_8.html

👆

Jainism: Teachings of Jainism

जैन धर्माची शिकवण

XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/10/blog-post_9.html

👆

Jainism: Sects in Jainism

जैन धर्मातील पंथ




Comment and share


Post a Comment

19 Comments

  1. प्रेरणादायी विचार

    ReplyDelete
  2. अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. आपले मनःपूर्वक धन्यवाद सर जी.

    ReplyDelete