पर्यावरण जनजागृती
Environmental Public Awareness
भारतात पर्यावरण विषयीची धोरणे शासकीय पातळीवर ठरविली जातात . त्यांची अंमलबजावणीही सुरू असते.
पर्यावरण संरक्षणाविषयी कायदेही भरपूर आहेत. पण भारतातील प्रत्येक व्यक्तीची पर्यावरण संतुलन बाबतीत काही कर्तव्य आहेत.
पर्यावरणाची निगा राखणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. म्हणून पर्यावरणासंबंधी जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांची मदत घेतली पाहिजे.
पर्यावरण विषयक अभ्यास प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयीन स्तरावर समाविष्ट केला गेला पाहिजे म्हणून जून 2005 पासून महाराष्ट्र सरकारने शालेय स्तरावर पर्यावरण अभ्यास सर्वांना सक्तीचा केला आहे .
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार विद्यापीठ अनुदान मंडळाने महाविद्यालयीन स्तरावर प्रथम/द्वितीय वर्षासाठी सर्व शाखांना पर्यावरण विषय जून 2004 पासून अनिवार्य केला आहे .यामुळे पर्यावरण विषयी जाणीव समाजात निर्माण होते.
पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी शैक्षणिक अभ्यास सहली ,गटचर्चा, कृतीसत्रे ,परिसंवाद, अधिवेशने, प्रदर्शन असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन ही चळवळ जनसामान्यांची आहे. याची जाणीव होणे ही काळाची गरज आहे.
X X
जनजागृतीची उद्दिष्टे
Objectives of Public Awareness
पर्यावरण जनजागृती किती महत्त्वाची आहे हे पुढील उद्दिष्टांवरून स्पष्ट होते.
1. लोकसंख्येचे संतुलन राखणे.
2. हवेची गुणवत्ता सुधारणे व टिकवून ठेवणे.
3. पाणी प्रदूषण ,अपव्यय थांबविणे व गुणवत्ता टिकवणे.
4. जमिनीचे प्रदूषण थांबविणे व जमिनीचा पोत सुधारणे.
5. ध्वनी प्रदूषण कमी करणे.
6. आण्विक अपघात व इतर आरिष्ठे हे कमी करण्याचा प्रयत्न करणे.
7.पृथ्वीवरचे वाढते तापमान कमी करणे.
8. हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करणे .
9. ओझोन वायूचा क्षय कमी करणे.
10. वाढते शहरीकरण ,औद्योगिकीकरण, जंगलतोड यास आळा घालने.
11. पर्यावरण खात्यांमधील भ्रष्टाचार प्रदूषणाबाबत जनमताचा आवाज उठविणे.
12. निसर्गाच्या ऱ्हसाला आळा घालने पर्यावरणाचा समतोल राखणे.
X X
जनजागृतीच्या पद्धती
Methods of Public Awareness
विविध उपक्रमांमधून पर्यावरण जनजागृती करता येते .त्यामध्ये काही पुढील जनजागृतीच्या पद्धती महत्त्वाच्या आहेत.
1. शालेय स्तरावर ,महाविद्यालयीन स्तरावर आणि समाजाच्या सर्व सर्व स्तरावर पर्यावरण शिक्षण सक्तीचे करणे.
2. सार्वजनिक, सरकारी व बिनसरकारी संस्था यांचा सक्रिय सहभाग व मार्गदर्शन.
3.शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम, प्रदर्शने, चर्चासत्रे, व्याख्याने, पर्यावरण ध्वनिफीत, चित्रपट यांचे आयोजन करणे.
4. सामाजिक कामातून जनजागृती करणे.
5. शासकीय स्तरावरील प्रमाणिक इच्छाशक्ती व जिद्द.
6. दूरदर्शन ,आकाशवाणी ,वर्तमानपत्रे यामार्फत जनजागृती.
X X
7. पर्यावरण समस्येच्या क्षेत्रांमध्ये शैक्षणिक सहलींचे आयोजन.
8.जागतिक पर्यावरण दिन वसुंधरा दिन, वन्यजीव सप्ताह साजरे करणे.
9. "झाडे लावा झाडे जगवा" या सारखी मोहीम हाती घेणे.
अशाप्रकारे पर्यावरण विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीने पर्यावरण शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.
त्यामुळे जनजागृतीसाठी पर्यावरण शिक्षण ही काळाची गरज आहे असे मानले जाते.
Comment and share..


7 Comments
Very nice
ReplyDeleteNice information
ReplyDeleteGood Information sir
ReplyDelete👍🏻👍🏻
ReplyDeleteGood
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice information
ReplyDelete