परिसंस्था Ecosystem
परिसंस्थेची संकल्पना
Concept of Ecosystem
पर्यावरणातील वातावरणाचा, त्यामधील बदलांचा पृष्ठभागावरील अजैविक व जैविक घटकांवर सतत परिणाम होत असतो.
पृष्ठभागावर जैविक व अजैविक क्रियाही नियमितपणे सुरू असतात . त्यांच्या परस्पर संबंधातून व आंतरक्रिया मुळे परिसंस्था साकारत असतात.
परिसंस्थांचा समतोल तत्त्वावर जीवसृष्टी अवलंबून असते. यासाठी परीसंस्थेची व्याप्ती गुणधर्म व आशय यांची सर्व अंगांनी माहिती घेणे हा पर्यावरणाचा मुख्य अभ्यास आहे.
भूपृष्ठावर निर्जीव किंवा अजैविक व सजीव किंवा जैविक घटकांचे अनादिकालापासून परस्परांशी सहसंबंध सुरू आहेत .परंतु अद्यापपर्यंत ही प्रक्रिया संपूर्णपणे कशी चालते हे ज्ञात नाही.
जन्मापूर्वीची अवस्था त्याच प्रमाणे मृत्यूनंतर प्राणी व वनस्पतींचे होणारे रुपांतरण यावर निश्चित भाष्य करता येत नाही. परंतु डार्विन, हेकल, रिटल , ओडम,बकल इत्यादी शास्त्रज्ञांनी अविरत प्रयत्नांनी सजीवसृष्टीच्या घडामोडीची उकल करण्यात निश्चित यश मिळवले आहे .
X X
गेल्या दोनशे वर्षात सजीव त्यांचे पर्यावरण भूपृष्ठावरील त्यांच्या वितरणाच्या शास्त्रशुद्ध माहिती व वरून वसाहत, परिस्थितीक ( Ecology ) व परिसंस्था ( Ecosystem) या पर्यावरणातील विद्याशाखांचा समृद्ध विद्याशाखा समृद्ध होत आहेत.
परिस्थितीकी शास्त्र
Concept of Ecosystem
परिस्थितीकी शास्त्रांमध्ये ( Ecology) सजीव जग व प्राकृतिक पर्यावरणामध्ये असणारे परस्पर संबंध व त्यामध्ये घडणाऱ्या क्रिया प्रतिक्रियांचा अभ्यास केला जातो .
तसेच जीव ,जीवसमूह आणि त्यांचे वस्तीस्थान यातील परस्पर संबंध हा परिस्थितीक शास्त्रज्ञांचा गाभा आहे .
म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक जीवाच्या जीवनचक्राचा अभ्यास स्वतंत्रपणे तसेच विविध जीवनचक्राचा अभ्यास समग्रतेने करणे म्हणजे परिस्थिती की शास्त्राचा अभ्यास होय.
इकॉलॉजी( Ecology) हा शब्द शतकापूर्वी अनर्स हॉकेल या जर्मन जीवशास्त्रज्ञाने प्रथम वापरला .हा शब्द ग्रीक ( Oikos) म्हणजे राहण्याची जागा किंवा घर ह्या शब्दापासून बनविला.
तर Logos म्हणजे त्या विषयीची चर्चा होईल. असा इकॉलॉजी या मूळ संज्ञाचा अर्थ आहे. असे शास्त्रज्ञ मानतात.
सजीवांच्या परस्पर संबंधावर सर्व सृष्टिक्रम अवलंबून आहे व ते क्रम सतत चालू राहतात. या विज्ञानाला सृष्टीतील अर्थव्यवस्था असेही म्हणतात.
X X
परिस्थितीकीची व्याख्या
Definitions of Ecology
पेट्रा इटस यांच्या मते,
"परिस्थितीकीतील जे घटक सजीवसृष्टीच्या हितावर नियंत्रण ठेवून प्रसाराचे ,विपुलतेचे, निर्मितीचे व उत्क्रांतीचे नियमन करतात अशा घटकांचा अभ्यास म्हणजे परिस्थितीक विज्ञान होय."
अन्सर हेकेल यांच्या मते.
"सजीवांचे भौगोलिक स्थान व त्यांच्यावर प्रत्यक्षपणे प्रभाव टाकणाऱ्या पर्यावरणीय घटकांची क्रिया यांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे परिस्थितीकीशास्त्र होय."
बकल यांच्या मते,
"सजीव व त्यांच्या सभोवतालचे पर्यावरण यांच्या सहसंबंध यांचे शास्त्र म्हणजे परिस्थितीकी शास्त्र होय."
परिस्थितीकीशास्त्राची व्याप्ती
Scope of Ecology
पर्यावरण ही प्रकाश ,तापमान ,जमीन ,पाणी इत्यादींची संमिश्र संकल्पना असून ती सजीवांच्या सभोवताली असते .
पर्यावरणावर परिणाम करणारे सजीव असेंद्रिय घटक हे परिस्थितीकीचे घटक असतात.
प्रकाशाचा संबंध प्रकाश संश्लेषणाची निगडित असतो.
पाणीही प्रकाश संश्लेषणात सहभागी होऊन हरितद्रव्य तयार करते.
कार्बन डाय-ऑक्साइड हरितद्रव्य निर्मितीत म्हणजे वनस्पती चे अन्न तयार करण्यास मदत करते.
X X
नायट्रोजन प्रत्यक्ष मदत करीत नसला तरी त्याचे नायट्रेट किंवा अमोनियात रूपांतर होऊन जमिनीची सुपीकता वाढते व
हवामान विषय घटकांपैकी तापमानामुळे अन्न निर्मितीची प्रक्रिया जलद होते.
बाष्पामुळे हरितद्रव्य निर्मितीस चालना मिळते. त्याचप्रमाणे पदार्थांचे विखंडन किंवा कुजण्याची क्रिया ही गतिमान होते.
वाऱ्यामुळे जीवांच्या प्रसरण ,वहन व प्रजोत्पादनासाठी चालना मिळते. जमिनीतील भिन्न रासायनिक घटकांमुळे जैविक प्रक्रिया भिन्न होतात.
जैविक म्हणजे प्राणी ,वनस्पती ,प्राणी यांच्या सहकार्याने अन्ननिर्मिती, प्रजोत्पादन ,उत्क्रांती यास मदत होते.
Comment and share..

.jpg)
8 Comments
✨👌
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDelete