Subscribe Us

header ads

Importance of Environmental Science पर्यावरणशास्त्राचे महत्त्व आणि प्रकार

 पर्यावरणशास्त्राचे महत्त्व

 Importance of Environmental Science


पर्यावरणीय अध्ययन हा एक सध्याच्या प्रगत होऊ पाहणारा अभ्यासक्रम जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे.

 कारण तो एक जीवनाविषयीचा दृष्टिकोन त्याची उद्दिष्टे ही मानवाच्या सुरक्षते पोषक ठरणारी आहे पण केवळ प्रगत शास्त्र करणारी लक्षात न घेता जीवनाची जडण-घडण सुयोग्य ठेवून परिस्थितीशी जुळते घेऊन दुर्दैवाने आचार विचारांचे नियमन करण्याचे कार्य यातून साधायचे आहे.

X X

1. पर्यावरणशास्त्राचे स्वरूप आंतरविद्याशाखीय असल्याने त्याचा विविध शाखांची संबंध येतो .त्यामुळे वैज्ञानिक संकल्पनांचा परिचय होतो.

2.पर्यावरणशास्त्राचा अभ्यास प्रामुख्याने निरीक्षण पद्धती द्वारा करावा लागतो .त्यामुळे अभ्यासाद्वारे अभ्यासकांची निरीक्षण क्षमता वृद्धिंगत होते व वृत्ती चिकित्सक बनते .अभ्यासातील सूक्ष्मदर्शीकता वाढल्याने योग्य निष्कर्ष काढणे सहज शक्य होते.

3. मानव हा जीवसृष्टीतील प्रगत बुद्धिमान प्राणी असल्याने त्याने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पर्यावरणाला वेठीस धरून स्वतःचे जीवन सुखी करण्यासाठी निसर्गात अनेक ठिकाणी हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे पर्यावरणाचे झालेले नुकसान जाणून घेण्यासाठी व त्याचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण भूगोलचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

4. पर्यावरण व्यवस्थापनाच्या अभावी निसर्गातील साधनसंपत्तीचा  गैरवापर होतो. त्यामुळे पर्यावरणाची अवनती व पर्यावरण प्रदूषण समस्या उद्भवतात त्यामुळे या समस्यांची उकल होते.

5. पर्यावरणाच्या समस्या लोकांसमोर आणण्यासाठी व त्यातून जनजागृतीचे काम पर्यावरण बचाव यासारखे कार्यक्रम शासकीय निमशासकीय ,खाजगी पातळीवर राबवले जातात.

X X

पर्यावरणाचे प्रकार

Types of Environment

जगामध्ये सर्वसाधारणपणे प्रमुख दोन प्रकारात पर्यावरणाचे वर्गीकरण केले आहे आहे.

1. नैसर्गिक पर्यावरण

Natural Environment

निसर्गामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणाला नैसर्गिक पर्यावरण असे म्हणतात. 

उदा. मृदावरण ,जलावरण ,वातावरण आणि प्राणी, वनस्पती ,सूक्ष्मजीव इत्यादी यांच्या संदर्भातील भौगोलिक घटकांचा समावेश नैसर्गिक पर्यावरणामध्ये केला जातो जगातल्या ज्या  प्रदेशांमध्ये अशा नैसर्गिक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. उदा. स्थान क्षेत्र ,आकार ,हवामान ,भूगर्भ रचना , प्राकृतिक रचना ,प्रवाहप्रणाली ,जमीन, मृदा,अशा प्रदेशाला नैसर्गिक प्रदेश असे म्हणतात.

X X

2. सांस्कृतिक पर्यावरण

Cultural Environment

मानव व त्याच्या सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरण यांच्या संबंधातून मानवनिर्मित पर्यावरण अस्तित्वात येत असते. या दोन्ही घटकांच्या वितरण व संबंधात स्थलपरत्वे व कालांतराने बदल होत असल्याने त्यांचा परिणाम मानवाच्या जीवनावर कमी जास्त झालेला दिसतो. 

सांस्कृतिक पर्यावरणात सामाजिक व आर्थिक घटकांचा समावेश होतो .मानवी वसाहती, वाहतुकीचे व दळणवळणाचे मार्ग ,औद्योगिकीकरण तांत्रिक प्रगती इत्यादी. 

सध्याच्या काळात नैसर्गिक पर्यावरण या बरोबरच मानवाचा विकास व जीवन यावर सांस्कृतिक पर्यावरणाचे घटक प्रभावी ठरत आहेत .

त्यामुळे संभववादी विचारप्रणालीचे लोक निसर्गापेक्षा सांस्कृतिक पर्यावरणाला विशेष महत्त्व देतात.

सध्या उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक वाहतूक व दळणवळणाच्या सुविधांचा परिणाम सध्याच्या काळात मानवी जीवनावर फार मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. 

कच्चामाल पक्का माल ,यंत्रसामग्री ,मजूर वर्ग ,शक्ती साधने इत्यादी वाहतुकीसाठी स्वस्त ,गतिमान व सुखकर वाहतुकीचे मार्ग उपलब्ध झाल्यामुळे औद्योगिकीकरणाला चालना मिळाली आहे. मुंबई या शहराची वाढ सर्व प्रकारचे वाहतुकीचे मार्ग उपलब्ध असल्यामुळे झालेली आहे .या कारखान्यात काम करण्यासाठी मजूर वर्गामुळे मुंबई शहराची वाढ होत आहे. 

म्हणून मानवाच्या जीवनावर सांस्कृतिक पर्यावरणातील त्या देशातील तांत्रिक प्रगती विशेष परिणाम करते.








View, Comments and share....

Post a Comment

5 Comments