पर्यावरणशास्त्राचे स्वरूप व मूलतत्त्वे
Nature and Fundamental Principles of Environmental Science
पर्यावरण शास्त्राचे स्वरूप अतिशय व्यापक आहे. विविध नैसर्गिक व सामाजिक शास्त्रांचा संकलित समन्वय या अभ्यासात अभिप्रेत असल्याने हा विषय सर्वस्पर्शी मानला जातो.
या शास्त्राचा भौतिकी, भूगर्भ, रसायन ,जीव या निसर्गशास्त्रा बरोबरच मानववंशशास्त्र ,मानसशास्त्र ,इतिहास, पुरातत्त्व व सामाजिक पर्यावरण शास्त्रांची घनिष्ठ संबंध येतो .
म्हणून पर्यावरणाचे स्वरूप आंतरविद्याशाखीय
( Interdisciplinary) आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न प्रत्येक ज्ञानशाखा करते व या सर्व शास्त्रात समन्वय साधण्याचे महत्त्वाचे कार्य पर्यावरणशास्त्र करत असते.
पर्यावरणातील विविध घटकांच्या आपापसात क्रिया-प्रतिक्रिया होऊन पर्यावरणीय आकृतिबंध वा संस्था(Environmental patterns/ systems) तयार होतात. हे अभ्यासले जातात. पर्यावरणातील संकीर्णता ( Complexity )नैसर्गिक घटकांमुळे किंवा मानवी हस्तक्षेपाने जटिल होते.
पर्यावरण शास्त्राचे स्वरूप आंतरविद्याशाखीय असल्याने पर्यावरणातील एखाद्या समस्येची छाननी करन्याआधी त्या विशिष्ट समस्येचे मूळ शोधणे आवश्यक असते.
पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासपद्धती
Approaches of Environmental Science
पर्यावरणतज्ञांच्या मते पर्यावरण भूगोलाच्या पुढील दोन अभ्यास पद्धती आहेत.
X X
1. परिस्थिती पद्धत किंवा परिसंस्था पद्धत
Ecological Approach or Ecosystem Approach
या पद्धतीत सजीवांच्या प्रभावी पर्यावरणातील घटकांचे सविस्तर अध्ययन केले जाते. या घटकावरच परिस्थितीकी रचना किंवा परिस्थिती संस्था आधारित असतात.
संपूर्ण पृथ्वी ही एक परिसंस्थाच आहे. यामध्ये मानव, वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव कार्यरत असतात आणि निसर्ग शक्तींचा परिणाम जीवसृष्टीवर सतत होत असते.
अशा विविध क्रिया -प्रक्रियातून इतर लहान मोठ्या परिसंस्थेत साकार होतात.
विविध परिसंस्थांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे.
जर एखाद्या घटकात बदल झाला तर संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो .प्रसंगी परिसंस्थेचा तोल ढासळतो.त्यामुळे त्या परिसंस्थेत जीवघेण्या समस्या निर्माण होतात .म्हणून त्या पद्धतीत विविध परिसंस्थांचा विस्तृत प्रमाणावर सखोल अभ्यास करून शास्त्रीय चिकित्सा केली जाते ,समस्यांचे मूळ पर्यावरणीय तत्वावर शोधून त्याच्या निर्मूलनासाठी मार्ग शोधले जातात.
2. वर्तणूक पद्धत
Behavioral Approach
या पद्धतीत पर्यावरणातल्या नैसर्गिक तसेच सांस्कृतिक घटकांचे विश्लेषण केले जाते. या विविध घटकांचे वर्तन दरवेळी अनुकूल असतेच असे नाही .
उदा. मानवी घटकांचे पर्यावरणाबाबत निष्काळजी वर्तन फार घातकी स्वरूपाचे आहे.
भविष्यकाळात मानवी हालचालींचा काय परिणाम होईल ,याचा बोध घेणे या पद्धतीत अभिप्रेत आहे.
निसर्गातील विविध चक्रे विकृत होत असल्याने विकृतीचा शास्त्रीय शोध घेणे वर्तणूक पद्धतीत समाविष्ट आहे.
उदा. मोसमी पर्जन्याची अनियमितता गेल्या दोन दशकात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे .
पावसाचे दरवर्षी होणारे सामान्य विचलन पाण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर करीत आहे.पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंत प्रश्न व्यापक होत आहेत. या मोसमी हवामानाच्या वर्तनाचा वेध घेणे या अभ्यास पद्धतीचा भाग आहे.
X X
पर्यावरणशास्त्रातील मुलतत्वे
Fundamental Principles of Environmental Science
पर्यावरण शास्त्राच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात काही मूलभूत तत्त्वे समजणे अत्यंत आवश्यक आहेत. काही मुलतत्वे खालील प्रमाणे,
1.पर्यावरणाच्या आत्तापर्यंतच्या संशोधनानुसार पृथ्वीवरच सजीवांचे अस्तित्व असून साधन संपदा यांचे वितरण नियमित व मर्यादित आहे.
2.पर्यावरणात्मक समस्यांची उकल करण्यासाठी संपूर्ण पृथ्वी प्रणाली आहे व त्या प्रणालीतील घटकांमध्ये सतत परिवर्तने होत असतात हे समजणे आवश्यक आहे.
3.जलावरण ,मृदावरण ,वातावरण व जीवावरण यात मानवाने सर्वात जास्त प्रमाणात बदल घडवून आणले मूळस्वरूपातील हे बदल तारक का मारक यांची शास्त्रीय चिकित्सा म्हणजे पर्यावरण शास्त्राचा पाया आहे.
4.पर्यावरण व्यवस्थेतील लहान-मोठ्या परीसंस्थांच्या संतुलनावर संपूर्ण पृथ्वीच्या परिसंस्थांचे अस्तित्व अवलंबून आहे .पृथ्वी देखील एक मोठी परिसंस्था आहे.
5. सजीवामध्ये जरी संख्यात्मक वाढ होते तरी तिला मर्यादा आहेत. सजीवांना आवश्यक जागा, द्रव्ये व ऊर्जा या गोष्टी पृथ्वीवर मर्यादित आहेत .अक्षय संपदा प्रदूषित झाल्यास त्या उपलब्ध असून सजीवांच्या दृष्टीने नसल्यासारखेच आहेत. उदा. जलसंपदा भरपूर असूनही प्रदूषणामुळे निरुपयोगी ठरत आहे.
6.मानव पर्यावरण आंतरक्रिया फार पूर्वीपासून कार्यान्वित बदल घडवून आणत असली तरी पृथ्वीच्या मानवीकरण्याची (Humanazation) तीव्रता व वारंवारिता वाढती आहे
7. मानवी हस्तक्षेप आ इतकेच नैसर्गिक परीक्षांचे पर्यावरण भूगोलात महत्त्व आहे उदा. पूर ,भूकंप, वादळ, टोळधाड, अवर्षण इत्यादी हे ओळखून त्याची तीव्रता कमी करणे. प्राणहानी व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने अध्ययनाची आवश्यकता असते.
X X
8. पृथ्वीच्या पर्यावरणात मानव हाच वेगाने बदल घडवून आणणारा प्रभावी घटक असल्यामुळे त्याच्या क्रिया प्रक्रियांची तपासणी पर्यावरण नियोजनासाठी प्राथमिक गरजेची असते.
9.मानवी निर्णयाची अंमलबजावणी योग्य व अयोग्य हे नीती तत्व व विश्वबंधुत्व या निकषावर ठरविले जाणे अभिप्रेत आहे.
10 शिक्षण पद्धतीत पर्यावरणविषयक जागरुकता ,संतुलन व संवर्धन या तत्त्वांचा समावेश जनमानसात सर्वसामान्यत विविध प्रसार माध्यमाद्वारे रोपण करणे आवश्यक आहे.
Comment and share......


6 Comments
अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteSuper n informative
ReplyDelete