सिंधू संस्कृती- भाग 4
सांस्कृतिक जीवन
Indus Civilization - Part 4
cultural life
विद्या व वांड्मय
सिंधू संस्कृतीतील लोकांना लेखन कला अवगत होती .हे येथील मुद्रांवर सापडलेल्या 250 पेक्षा अधिक वर्णा वरून स्पष्ट होते. तरीपण या संस्कृतीतील लिपी ओळखणे अजून शक्य झाले नाही . संस्कृती विषयी वैदिक संस्कृती सारखे वेदवांड्मय वगैरे काहीच उपलब्ध नसल्यामुळे वांड्मयीन प्रगतीबद्दल माहिती मिळणे शक्य नाही.
कला
अनेक प्रकारच्या कलात्मक वस्तू येथील कलेची प्रगती दर्शवतात .विविध प्रकारच्या कोरीव मुद्रा कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल .मुद्रांवर मानव व प्राणी यांचे चित्रे कोरीत असत उदा. प्राण्यांमध्ये लांब पोळे असलेला बैल ,गेंडा ,वाघ, हत्ती, हरीण व मैस हे प्राणी असत. नर्तिकेची प्रतिमा आणि मानवाचा पुतळा शिल्पकलेची प्रगती दर्शवतात. या कलाकृती मध्ये जिवंतपणा, कृत्रिमता आणि कल्पकता पाहायला मिळते. कुभारांच्या, सुतारांच्या व सोनारांच्या कला या प्रगतीची साक्ष देतात.
X X
स्थापत्य
एकाच प्रकारच्या साध्या इमारती बांधकामावरून स्थापत्य कलेत मात्र विशेष प्रगती झालेली दिसत नाही. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली एकही इमारत सापडली नाही. बांधकाम करताना कला सौंदर्य व श्रंगार यापेक्षा उपयोगिता व भव्यता ही गोष्ट केंद्रित केली गेली असावी. मोहेंजोदारो हरप्पा वगैरे घरांची योजना नगररचना, गृहरचना यावरून कारागीरात उत्कृष्ट स्थापत्य कला, बुद्धी होती. पण एकसारखेपणा प्रमाणबद्धता व उपयोगिता यांना बांधकामात महत्त्व असल्यामुळे त्यांच्या त्या प्रतिभेला वाव मिळाला नसावा असे संशोधकांना वाटते.
राजकीय जीवन
सिंधू संस्कृती मध्ये राजकीय जीवनाची निश्चित माहिती मिळत नाही. तरी पण एवढ्या सुव्यवस्थित वैभवशाली संस्कृतीत समाजाचे नियंत्रण ,नियमन व रक्षण करणारी उत्तम प्रशासन व्यवस्था असावी. याबद्दल कुठलाही शोध झालेला नाही. या प्रदेशात एक मोठे साम्राज्य असून हडप्पा व मोहेजोदारो ही नगरे त्यांच्या दोन राजधान्या असाव्यात असा तर्क संशोधकांनी बांधला. कारण प्राचीन काळात प्रत्येक संस्थांची साम्राज्याची दोन राजधान्या असत.सिंधू संस्कृतीत लहान-लहान नगर राज्यांचे अस्तित्व असावे असे संभवते . तसेच उत्खननात नगरात सापडलेल्या विशाल इमारतीवरून नगरांचा कारभार पाहण्यासाठी नगराधीपती असावा व त्या इमारतीत त्यांचे निवासस्थान व कार्यालय असावे . हे सर्व नगरे स्थानिक स्वायतत्ता असून नगरांचे संरक्षण करण्याचे कार्य नगराधीपतीकडे असावे व त्यासाठी त्याला मदतीसाठी अधिकारी वर्ग असावा. पण याठिकाणी नगरराज्य होती. साम्राज्य होते, लोकसत्ता होती हे सांगणे संशोधकांच्या मते कठीण आहे.
X X
कालनिर्णय ( कालखंड )
सिंधू संस्कृतीचा निश्चित काळ सांगणे कठीण आहे. याबद्दल विविध संशोधकांची वेगवेगळी मते आहेत. त्यात डॉ. सर जॉन मार्शल यांच्या मते सिंधू संस्कृतीचा आरंभ इ.स. पूर्व 3250 नंतर झाला असावा.
मेसोपोटेमिया सापडलेल्या सिंधू संस्कृतीच्या मुद्रा वरून हाच काळ निश्चित होतो. सिंधू संस्कृती सारख्या तीस मुद्रा ऊर, किश, उम्मा, लागाश, सुसा या ठिकाणी सापडल्या आहेत. या मुद्द्यांच्या आधारावर इतिहासकार "व्हिलर" सिंधू संस्कृतीचा काळ इ. स. पूर्व 2500 ते 1500 असा अंदाज दर्शवतात.
सिंधू संस्कृतीचा अंत आर्यांनी घडवून आणला असेल आणि ती आर्यापूर्वीची संस्कृती आहे हे निश्चित झाले तर सिंधू संस्कृतीचा काळ ऋग्वेदाच्या मदतीने ठरविता येईल. ऋग्वेदात आर्यांनी उंच भिंतीच्या नगरातील नगरवासी यांना पराभूत केले असे वर्णन आहे.हरप्पा मोहेंजोदारो येथील उत्खननात रस्त्यावर व घरात मानवांची हाडे भरपूर प्रमाणात आढळली. यावरून या रहिवाशांची ते पळत असताना रस्त्यावर व घरात कत्तल केली असावी .असे ऋग्वेदाच्या आधारे सिंधू संस्कृतीचा काळ इ. स.पूर्व 3000 ते 2000 हा निश्चित होतो. असे काही संशोधकांचे मत आहे
पण अलीकडे इ. स. पूर्व 2250 ते 1750(500 वर्षे ) हा काळ सर्वमान्य संशोधकांनी मान्य केलेला आहे.
सिंधू संस्कृतीचे निर्माते (द्रविड, अनार्य)
X X
या संस्कृतीत निवाशाची व निर्मात्यांची निश्चित माहिती मिळाली नाही, पण हरप्पा येथील उत्खननात चार प्रकारच्या मानववंशाची सांगाडे सापडलेले आहेत. त्यावरून येथे भूमध्यसागरी, प्रोटोऑस्ट्रेलाईड ,मंगोलियन व अल्पाईन अशा भिन्न वंशाचे लोक राहत होते. असे दिसते पण हराप्पा किंवा मोहेंजोदारो ही व्यापारी नगरी असल्यामुळे येथे देशी-विदेशी व्यापारी राहत असत यावरून या संस्कृतीच्या निर्मात्याची कल्पना करणे योग्य होईल असे काही संशोधकांना वाटते. पण या संस्कृतीचे द्रविड संस्कृतीशी बरेच साम्य आढळून येते. एके काळी सिंधू संस्कृती चा विस्तार सिंधू ,पंजाब व बलुचिस्तान पर्यंत झाला होता. त्या ठिकाणी लोक द्रविड भाषा आजही बोलतात. यावरून या संस्कृतीचे निर्माते द्रविड, अनार्य असावेत असे काहींना वाटते.
विनाशाची कारणे
आर्यांच्या आक्रमणामुळे ही संस्कृती नष्ट झाली असावी किंवा नद्यांनी वारंवार त्यांची पात्र बदलणे ,महापूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्ध या संस्कृतीचा विनाश झाला असे काही संशोधकांना वाटते. कारण अपुऱ्या पुराव्यामुळे याबाबतीत कोणालाही निश्चित मत व्यक्त करता येत नाही.
Comment and share....


12 Comments
Very nice
ReplyDeleteसर आपले मनःपूर्वक अभिनंदन. खूपच छान मार्गदर्शन करत आहात.
ReplyDeleteInformative
ReplyDeleteहोय...
DeleteVery nice
ReplyDeleteGood information sirji
ReplyDeleteSuper
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteआवडलंय...
ReplyDeleteखूप छान माहिती।
ReplyDelete