Subscribe Us

header ads

जॉर्ज बर्न्हार्ड रीमान-चौथ डायमेन्शन -भाग 1

 जॉर्ज बर्न्हार्ड रीमान-चौथ डायमेन्शन 



भाग 1

युक्लीडन दोन हजार वर्ष चालवलेलं गणिताचे राज्य रिमानन त्यांच्या अल्पायुष्यात उलथवून टाकलं होतं. 

10 जून 1854 रोजी गोंटेजन विद्यापीठातल्या प्राध्यापक समोर रिमाननं एक भाषण दिलं आणि एक जादूची कांडी फिरवल्यासारखं चौथ्या आणि जास्त मीतीची (डायमेन्शन) भूमिती समोर उभी केली म्हणजे रिमानन ही क्रांती कशी केली हे बऱ्याच जणांना समजेना.

X X

1826 साली एका गरीब कुटुंबात रीमान चा जन्म झाला. तो गणितात प्रचंड हुशार होता .

859 पानी पुस्तक रीमानन फक्त सहा दिवसात सर्व वाचून संपवलं आणि त्यामुळेच त्यावर विचारलेल्या सगळ्या अवघड प्रश्नांची उत्तर तो तात्काळ देत असे.

 त्याच्या वडिलांनी गोंटेंजन विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवलं . तिथे त्याला गाऊस नावाच्या प्रसिद्ध  गणिततज्ञला तो भेटला गाऊस हे गणितामध्ये सर्वश्रेष्ठ नाव होतं.

X X

युक्लिडन" एलिमेंट्स "नावाचं पुस्तक लिहिलं होतं. ते पुस्तक खूप प्रभावी मानले गेले. हजारो इमारती रस्ते त्याच्या तत्त्वाप्रमाणे बांधले गेले होते .

त्याच्या भूमिती प्रमाणे दोन समांतर रेषा कधीही मिळत नव्हत्या आणि त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज 180 डिग्री होत होती. 

त्यात तीनच मीत्या ( डायमेन्शन्स) होत्या. या पुस्तकात आणि टोलेमीने 1500 मध्ये चौथे डायमेन्शन असू शकत नाही. असं म्हटलं होतं आणि ते सिद्धही केलं होतं.

गाऊस कडे आल्यावर त्याला गाऊसन" भूमितीची मूलतत्त्व" यावर भाषण देण्यासाठी तयारी करायला सांगितली. तेव्हा रीमन गोंधळून गेला .

त्यानंतर त्याने मग अभ्यास करायला सुरुवात केली. युक्लीड जी गृहितके  धरलेली होती ,ती न धरता काय होईल? असा त्याने विचार केला . 

 अनेक महिने सतत काम करून त्याला मध्येच "नर्व्हस ब्रेकडाऊन "चा त्रास व्हायचा. हे सगळं होऊन शेवटी त्यांन तीन पेक्षा जास्त डायमेन्शन च्या भूमितीची तत्व मांडली आणि गणिताच सगळं जग हादरून टाकलं !त्याने त्याच्या "मॅट्रिक टेन्सर "च्या साह्याने नवीन अनेक मीतीन (डायमेन्शन्स) गणित रचलं होतं .

आपण तीनच मीती बघू शकतो .चालतो आणि राहतोही . लांबी ,रुंदी आणि उंची किंवा क्ष, य आणि झ. मग जास्तीची ही डायमेन्शन्स येणार कुठून? कसंअसेल चार डायमेन्शन्स जग?

त्यावेळी हेल्महेल्ट्झ हा खूपच प्रसिद्ध जर्मन शास्त्रज्ञ होता. त्यांन रीमानच्या कल्पना लोकप्रिय करायला सुरुवात केली. पण त्यांन त्याच्या 'पॉप्युलर लेक्चर्स ऑफ सायंटिफिक सब्जेक्ट्स "या 1881 साली लिहिलेल्या पुस्तकात हे चौथे डायमेन्शन आपल्याला बघता येणार नाही किंवा त्याविषयी कल्पनाही करता येणार नाही. असं लिहिलं होतं .

रीमान हा काळाच्या पुढे होता .त्याने अनेक डायमेन्शनच गणित तर मांडून ठेवलं होतं, पण त्याच्या या आजूबाजूच्या जगात वापर कुठे होईल हे मात्र लोकांना कळत नव्हतं. 

आईन्स्टाईनची जनरल थेअरी आणि पुढे आलेल्या युनिफिकेशन थेअरी मध्येच अनेक डायमेन्शन ची कल्पना पुन्हा वर येणार होती.

X X

आता चौथ्या डायमेन्शन ची कल्पना करणार तरी कशी? समजा आपण दरवाजा उघडावा न लागता कुठल्याही खोलीत त्या दरवाजातून आरपार जाऊ शकलो तर काय होईल? आणि तसंच आपण दुसऱ्या भिंतीतुनही आरपार जाऊ शकलो तर ?समोर पर्वत दिसले तरी त्यांना वळसा घालन्याची ही गरज भासणार नाही आपण त्यातून आरपार जाऊ शकू आणि आपल्याला समजा कुठूनही केव्हाही अदृश्य होऊन कुठेही केव्हाही प्रगट होता आलं तर? यासाठी आपल्याला विमानांची ही गरज भासणार नाही.

 फक्त एका ठिकाणाहून नष्ट व्हायचं आणि दुसऱ्या ठिकाणी प्रगट व्हायचं. फक्त यात प्रश्न हा की, हे सगळं केव्हा आणि कुणाला शक्य होईल? तर तीन हून जास्त डायमेन्शन मध्ये वावरणाऱ्याला हे शक्य होईल? याची आपण कल्पनाच करू शकत नाही.

त्या काळात या चौथ्या डायमेन्शनन सामान्य लोकांना चक्क वेड लावलं होतं! याविषयी फारसे एक तर माहीत नव्हतं आणि कुतुहूल कुतूहल तर होतं. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी तर चौथ्या डायमेन्शन युरोपमधल्या कलेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रात बाराच गोंधळ माजवला होता.

 पूर्वी लोक चौथा डायमेन्शन हे इतर तीन प्रमाणेच" स्पेस"चा मानलं .1754 चाली "डायमेन्शन " या लेखात प्रथम 'जिआ दि अलेंबर्ट'यांनी वेळ हे चौथे डायमेन्शन आहे ही कल्पना मांडली.

चौथ्या डायमेन्शनचा चित्रे चित्रकलेवर ही प्रचंड परिणाम झाला इसवीसन 1890 -1910 ही चौथ्या डायमेन्शन ची सोनेरी वर्ष होती .

याच काळात चौथे डायमेन्शन हे कला, साहित्य, चित्रकला आणि तत्त्वज्ञान अशा इतरही सगळ्यात घुसल होत.

 चौथ्या डायमेन्शन मुळे क्युबिझम आणि एक्सप्रेशननिझम या चित्रकलेच्या प्रकारावर खूपच प्रभाव पडला. त्यांच्या दृष्टीने चौथे डायमेन्शन म्हणजे भांडवलशाहीने स्वार्थ, पैसा ,पिळवणूक वगैरेचा जो अतिरेक केला होता त्या विरुद्धचा उठाव होता.







comments and share......


Post a Comment

3 Comments