Subscribe Us

header ads

Natural structure of India भारताची नैसर्गिक रचना

 भारताची नैसर्गिक रचना

Natural structure of India



भारताला भारत, हिंदुस्थान व इंडिया ही प्रमुख नावे आहेत.

भारत हे नाव कसे पडले याबद्दल मतभेद आढळतात जैन अनुष्कृती नुसार भगवान ऋषभ देवाच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव भरत होते. त्यावरून हे नाव पडले असे सांगण्यात येते .दुसरे मत असे की प्रसिद्ध राजा दुष्यंत यांच्या पुत्राचे नाव भरत असून तो चक्रवर्ती राजा होता त्यावरून भरत हे नाव पडले असे समजण्यात येते.

x x

हिंदुस्तान

मुस्लिम आक्रमकांनी काबीज केलेला प्रदीप पहिला प्रदेश सिंधू नदीच्या मुखाजवळील सिंध हा होय. इसवी सन 712. त्यांच्या अहिराणी भाषेत स चा उच्चार ह असा होत असल्यामुळे सप्तसिंधू या शब्दाचा उच्चार हप्तसिंधू असा करू लागले. सिंधू चा अपभ्रंश हिंदू असा झाला. त्यामुळे भारताला हिंदुस्थान असे म्हणू लागले. सुरुवातीला उत्तर भारताला हिंदुस्थान म्हणत व दक्षिण भारताला दख्खन म्हणत पण नंतर संपूर्ण भारतालाच हिंदुस्थान हे नाव पडले.

इंडिया

ग्रीक आणि रोमन लोकांनी हिंदू Hindu या शब्दातील ह गाळून टाकला. तो सिंधूला इंडू Indu इंडोई Indoiइंडस Indus असे संबोधू लागले. या शब्दापासून अच् युरोपियन लोक भारताला इंडिया असे म्हणू लागले.

x x

मानवाचा इतिहास घडविण्यात नैसर्गिक परिस्थितींचा महत्त्वाचा वाटा असतो. जगातील अनुकूल नैसर्गिक परिस्थितीच्या प्रदेशातच वैभवशाली संस्कृतीचा उदय झालेला आढळतो .भारतालाही अनुकूल नैसर्गिक स्थिती लाभलेली आहे तिचा भारतीय इतिहासावर परिणाम झालेला आहे.

भारताचा विस्तार

भारत हा एक विशाल देश आहे त्याची पूर्व पश्चिम लांबी साधारणता 4000 चार हजार किलोमीटर असून उत्तर-दक्षिण रुंदी 3200 तीन हजार दोनशे किलोमीटर आहे त्याला 9600नऊ हजार सहाशे किलोमीटर भू सरहद्द व 8000 आठ हजार किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे तर 32 लक्ष चौरस किलोमीटर आहे. एवढ्या विशाल विस्तारामुळे संपूर्ण भारत एका सत्तेच्या अधिपत्याखाली असणे शक्य नव्हते प्राचीन काळी आजच्यासारखी दळणवळणाची व वाहतुकीची साधने नव्हती .तरीदेखील मौर्य घराण्याने आपली सत्ता जवळपास संपूर्ण भारतावर स्थापन केली होती. त्यानंतर इंग्रजा पर्यंत कुणाला संपूर्ण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणता आला नाही.







view,Comments and share.......

Post a Comment

4 Comments

  1. छान महिती आहे, कमी शब्दात बरच काहि सांगून जाते.

    ReplyDelete