Culture and Development
संस्कृती आणि सुधारणा...
संस्कृती या शब्दाचा अर्थ संस्कार असा होतो. योग्य संस्कारा द्वारा व्यक्तीचे मन व बुद्धी यांचा विकास घडवून सुसंस्कृत करणे आणि आंतरिक व अध्यात्मिक सामर्थ्य वाढवून जीवनातील सत्यम शिवम सुंदरम गोष्टींचा आस्वाद व नाम करून घेणे अशी व्याख्या करता येते.
पशु वृत्तीचा नाश करून मानवतेचा विकास करणे हे संस्कृतीचे कार्य आहे.
सुधारणेत मानव समाजाचा बाहेर विकास होत असतो यात मानवी जीवन सुखी समृद्ध व सोयीस्कर बनविणाऱ्या सर्व भौतिक साधनांचा समावेश होतो.
रेल्वे वगैरे वाहतुकीची साधने टेलिव्हिजन सिनेमा वगैरे प्रसारमाध्यमे आणि मानवाच्या सुख समृद्धी व उपभोगत भर टाकणाऱ्या सर्व भौतिक वस्तूंचा सुधारणेत अंतर्भाव होतो.
X X
संस्कृती व सुधारणा यांचा घनिष्ठ संबंध आहे म्हणजे त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे सुधारणा हा देह तर संस्कृती या देहातील प्राणज्योत असते.
सुधारणे द्वारा प्रामुख्याने शारीरिक सुख मिळते तर संस्कृती द्वारा मानसिक सुख समाधान प्राप्त होत असते.
भारताला प्राचीन व वैभवशाली संस्कृती आहे भारतीय संस्कृती एक जिवंत संस्कृती आहे तिची वैशिष्ट्ये आजही बघायला मिळतात कारण ती मूलभूत अशी क्रियाशील संस्कृती आहे.
भारतीय संस्कृतीत अनेक परस्परविरोधी गोष्टी आढळत असल्या तरी त्या सर्वात एक प्रकारची एकात्मता आहे.
X X
View, Comments and share.....


2 Comments
समर्पक...
ReplyDelete👍👍👍👍👍
ReplyDelete